"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 15:12 IST2025-11-09T15:09:04+5:302025-11-09T15:12:21+5:30
“अशा बातम्यांना भारत घाबरत नाही. ज्यांची परिक्षण करण्याची इच्छा असेल, त्यांनी करावे. आपण त्यांना कसे थांबू शकणार? काहीही असो, आम्ही कोणत्याही स्थितीसाठी तयार आहोत.”

"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
नवी दिल्ली – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्या करत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. “भारत कोणत्याही स्थितीसाठी तयार आहे,” असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “अशा बातम्यांना भारत घाबरत नाही. ज्यांची परिक्षण करण्याची इच्छा असेल, त्यांनी करावे. आपण त्यांना कसे थांबू शकणार? काहीही असो, आम्ही कोणत्याही स्थितीसाठी तयार आहोत.”
यावेळी, जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर भारतही तसेच करेल का? असे विचारले असता सिंह म्हणाले, “पहिले बघायला तर हवे, ते खरोखर चाचणी करतात की नाही? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, अमेरिका 30 वर्षांहून अधिक काळानंतर, अण्वस्त्रांचे परीक्षण पुन्हा सुरू करणार. इतर देश चाचण्या करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे उदाहरण देते, इस्लामाबाद सातत्याने अणुपरीक्षण करत, असल्याचेही ट्रम्प म्हणाले होते.
दरम्यान, भारताने ट्रम्प यांच्या या वक्तव्याची दखल घेतली आहे. यासंदर्भात भाष्य केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “पाकिस्तानचा अणु कार्यक्रम दशकांपासूनच तस्करी, निर्यात नियंत्रणाशी संबंधित उल्लंघन आणि गुप्त भागीदारीवर आधारित आहे. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष, पाकिस्तानचा अणु प्रसार आणि अणुबॉम्बचे जनक ए.क्यू. खान यांच्या हालचालींकडे आकर्षित केले आहे. खान यांचा 2021 मध्ये मृत्यू झाला आहे.