“अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक, गरज पडली तर...”; राजनाथ सिंहानी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 02:59 PM2021-08-29T14:59:34+5:302021-08-29T15:04:16+5:30

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे नमूद केले आहे.

rajnath singh says situation in afghanistan is challenging we will change our strategy | “अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक, गरज पडली तर...”; राजनाथ सिंहानी स्पष्टच सांगितले

“अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक, गरज पडली तर...”; राजनाथ सिंहानी स्पष्टच सांगितले

Next
ठळक मुद्देअफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मकभारताचे सर्व गोष्टींवर बारकाइने लक्षराजनाथ सिंह यांचे पाकिस्तानवरही जोरदार टीकास्त्र

वेलिंगटन:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सरकार स्थापण्याची हालचाल सुरू असतानाच काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी थेट बदला घेण्याची भूमिका घेतल्याने आता पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच एकूण परिस्थितीबाबत भारताने सावध पवित्रा घेतला आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे नमूद केले आहे. (rajnath singh says situation in afghanistan is challenging we will change our strategy)

अफगाणिस्तावर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती खूपच आव्हानात्मक झाली आहे. या परिस्थितीने अनेक देशांना आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्यास भाग पाडले आहे. भारत सर्व गोष्टींवर बारकाइने लक्ष ठेवून आहे. गरज पडल्यास आपल्यालाही रणनीतीमध्ये बदल करावा लागेल, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. तामिळनाडूमधील वेलिंगटन येथे ते बोलत होते. तसेच संरक्षण मंत्रालयाकडून इंटीग्रेटेड बॅटल ग्रुप तयार करण्यावर विचार केला जात आहे. आगामी काळात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर तेव्हा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या ग्रुपची मोठी मदत होईल, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले. 

“१० लाख शेतकऱ्यांनी PM निवासस्थानालाच घेरले, तर मोदी सरकार काय करणार?”

पाकिस्तान गप्प आहे, कारण भारत बदललाय

राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना पाकिस्तानवर जोरदार टीकास्त्र सोडले. दोन युद्धात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांना हाताशी धरून भारताला त्रास देण्यास सुरुवात केली. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, शस्त्रास्त्रे पुरवण्याचे काम करतोय. आताच्या घडीला सीमेवर शांतता आहे. पाकिस्तान गप्प आहे, याचे कारण भारत बदललाय हे त्यांना माहिती आहे. दहशतवाद्यांना तसेच पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले. 

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये लडाख येथेही परिस्थिती आव्हानात्मक झाली होती. तेव्हा रात्री ११ वाजता लष्कर प्रमुख यांच्याशी महत्त्वाची चर्चा करण्यात आली. यानंतर आपले जवान देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी किती कटिबद्ध आहे सर्वांनीच पाहिले, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले. 
 

Web Title: rajnath singh says situation in afghanistan is challenging we will change our strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.