India China FaceOff: चीनला चोख प्रत्यूत्तर! राजनाथ सिंहांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेट नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 04:19 PM2020-09-02T16:19:27+5:302020-09-02T16:20:48+5:30

India China FaceOff: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एससीओच्या बैठकीत सहभाग घेणार आहेत. यासाठी ते बुधवारी रशियाला रवाना झाले आहेत. ही बैठक अशावेळी होत आहे जेव्हा संघटनेचे दोन मोठे देश सीमेवर एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

Rajnath Singh refuses to meet Chinese defense minister in Russia's SCO | India China FaceOff: चीनला चोख प्रत्यूत्तर! राजनाथ सिंहांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेट नाकारली

India China FaceOff: चीनला चोख प्रत्यूत्तर! राजनाथ सिंहांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेट नाकारली

Next

भारत-चीन (India-China Tension) मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने एक मोठा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) शांघाय सहकार्य परिषदेला (SCO) उपस्थित राहण्यासाठी आज रशियाला रवाना झाले आहेत. सुत्रांनुसार राजनाथ सिंह यांनी चीनच्या समकक्षाशी चर्चेचा कोणताही कार्यक्रम ठेवलेला नाही. राजनाथ सिंहांनी यास नकार दिला आहे. 


पँगाँग झील (India-China Pangong Lake Faceoff) वर झालेल्या ताज्या वादामुळे भारत आणि चीनमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. यावर अधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व सैन्याचे ब्रिगेड कमांडर करणार आहेत. मंगळवारीही कमांडरस्तरावरील बैठक झाली होती. चीनच्या सैन्याने 29-30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग झीलच्या दक्षिण बँक क्षेत्रात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने आक्रमक कारवाई करत त्यांना माघारी पाठविले होते. 


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एससीओच्या बैठकीत सहभाग घेणार आहेत. यासाठी ते बुधवारी रशियाला रवाना झाले आहेत. ही बैठक अशावेळी होत आहे जेव्हा संघटनेचे दोन मोठे देश सीमेवर एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चार सप्टेंबरला होणाऱ्या एससीओतील संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासोबतच रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये शस्त्रास्त्रे खरेदी आणि सहकार्यावर चर्चा होणार आहे. 

दणकट टाटा नेक्‍सॉनचे नवे व्हेरिअंट आले; जाणून घ्या किंमत अन् खास फिचर्स


या एससीओच्या बैठकीत चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे  आणि पाकिस्तानी संरक्षण मंत्री परवेज खटकदेखील येणार आहेत. एससीओच्या देशांमध्ये एकत्रित युद्धसराव होणार होता. यामध्ये पाकिस्तान आणि चीनदेखील सहभाग घेणार आहेत. यामुळे भारताने या युद्धसरावात भाग घेण्यास नकार दिला आहे. 

गेल्या चार महिन्यांपासून लाडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्याच्या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता या भागात भारतीय लष्कराने आक्रमक धोरण अवलंबले आहे. तसेच पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात चीनने जैसे  थे परिस्थिती बदलण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच या भागात आक्रमक राहण्याची  सूचना केली आहे. दरम्यान, लडाखमधील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील चारी बाजूला असलेल्या पर्वतांवर भारतील लष्कराने पाय रोवले आहेत. त्यामुळे या भागात घुसण्याचा प्रयत्न करत असलेल्या चीनची कोंडी झाली आहे.

Web Title: Rajnath Singh refuses to meet Chinese defense minister in Russia's SCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.