Yaas Cyclone: “देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:50 PM2021-05-28T22:50:43+5:302021-05-28T22:54:10+5:30

Yaas Cyclone: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वर्तणुकीनंतर आता टीका होण्यास सुरुवात झाली आहे.

rajnath singh criticised mamata banerjee over yaas cyclone meeting | Yaas Cyclone: “देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले

Yaas Cyclone: “देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले

Next
ठळक मुद्देदेशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायीराजनाथ सिंहांनी अप्रत्यक्षरित्या ममता दीदींना सुनावले

नवी दिल्ली: पश्चिम किनारपट्टीला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर लगेचच पूर्व किनारपट्टीला यास चक्रीवादळ (Yass Cyclone) धडकले. यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालमधील भागाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी दौरा केला. यानंतर आढावा बैठकही घेतली. मात्र, यावेळीही ममता बॅनर्जी सरकार आणि केंद्रातील वाद शमलेला दिसला नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वर्तणुकीनंतर आता टीका होण्यास सुरुवात झाली असून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या पंतप्रधानांसोबत असा व्यवहार वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. (rajnath singh criticised mamata banerjee over yaas cyclone meeting) 

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपला चीतपट करत तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. मात्र, तरीही ममता बॅनर्जी आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यातील वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यास चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी, राज्यपाल जयदीप धनखर यांना ताटकळत ठेवल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. 

“केंद्र सरकार कंपन्यांच्या फायद्यासाठी लसींचा कृत्रिम तुटवडा निर्माण करतंय”

देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी

राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पश्चिम बंगालमधील आजचा घटनाक्रम धक्कादायक आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान व्यक्ती नसून संस्था आहेत. दोघांनी जनतेच्या सेवेचा संकल्प आणि संविधानाबद्दल निष्ठा ठेवण्याची शपथ घेऊनच पदग्रहण केले आहे. संकटाच्या काळात जनतेला मदत देण्याच्या भावनेने आलेल्या पंतप्रधानांसोबत अशा प्रकारचा व्यवहार वेदनादायी आहे. जनतेच्या सेवेचा संकल्प आणि संविधानाने दिलेल्या कर्तव्यांच्या वर राजकीय मतभेदांना ठेवण्याचे हे एक दुर्दैवी उदाहरण आहे. हे भारतीय संघव्यवस्थेच्या भावनेला धक्का पोहोचवणारे आहे, असे ट्विट राजनाथ सिंग यांनी करत ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. 

Yaas चक्रीवादळ: पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडला एक हजार कोटींची मदत; PMO ची घोषणा

नेमके काय घडले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा हवाई पाहणी दौरा केला. यानंतर ते पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनकर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतच्या पूर्वनियोजित बैठकीसाठी पोहोचले. मात्र, या बैठकीसाठी ममता बॅनर्जी तब्बल अर्धा तास उशिराने पोहोचल्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जगदीप धनकर यांना तब्बल अर्धा तास ममता बॅनर्जी यांची वाट पाहावी लागली, असे सांगितले जात आहे. राज्यपाल जगदीप धनखर यांनी या माहितीला दुजोरा देणारे ट्विट केले.

फार्मा क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; ‘या’ ५ कंपन्यांचे ७ हजार कोटींचे IPO येणार

दरम्यान, यास चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झालेल्या पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड राज्यांना १ हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच या चक्रीवादळात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना दोन लाख तसेच गंभीररित्या जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले. 
 

Web Title: rajnath singh criticised mamata banerjee over yaas cyclone meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.