रजनीकांत हा महामूर्ख आणि आडाणी: सुब्रमण्यम स्वामी

By Admin | Updated: May 21, 2017 10:40 IST2017-05-21T10:19:38+5:302017-05-21T10:40:36+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा राजकारणात येणार असल्याची चर्चा जोरात आहे. भाजपा त्यांना आपल्याकडे खेचत असल्याचं वृत्तही काही दिवसांपूर्वी आलं होतं.

Rajinikanth is a great idiot and an idiot: Subramaniam Swamy | रजनीकांत हा महामूर्ख आणि आडाणी: सुब्रमण्यम स्वामी

रजनीकांत हा महामूर्ख आणि आडाणी: सुब्रमण्यम स्वामी

>ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 21 - गेल्या अनेक दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा राजकारणात येणार असल्याची चर्चा जोरात आहे. भाजपा त्यांना आपल्याकडे खेचत असल्याचं वृत्तही काही दिवसांपूर्वी आलं होतं. मात्र आता नेहमी वादग्रस्त विधान करणारे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रजनीकांत यांना लक्ष्य केलं आहे. "रजनीकांत हा महामूर्ख आणि आडाणी माणूस आहे. असं ते म्हणाले आहेत.  
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विश्व संवाद केंद्रातर्फे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाबाबत पत्रकारांशी बोलताना "रजनीकांत हा महामूर्ख आणि आडाणी माणूस आहे. या आडाण्याला राजकारणात आणण्यासाठी अनेकजण धडपडत आहेत," भारत आणि पाकिस्तानचं संविधान रजनीकांतच्या समोर ठेवलं तरी त्यांना भारताचं कोतं व पाकिस्तानचं कोणतं हे समजणार नाही, अशा शब्दांत स्वामींनी रजनीकांत यांची खिल्ली उडवली.
 
सुब्रमण्यम स्वामी यांच्या या वक्तव्यामुळं रजनीकांत यांना भाजपामध्ये आणण्याच्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो. 
 
 
 

Web Title: Rajinikanth is a great idiot and an idiot: Subramaniam Swamy