शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

राजेश मूणत यांच्या कथित सेक्स सीडी प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, छत्तीसगड सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 9:01 PM

नवी दिल्ली- छत्तीसगडचे मंत्री राजेश मूणत यांच्या कथित सेक्स सीडी प्रकरणाची आता सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. रमण सिंह सरकारने शनिवारी यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. कॅबिनेटच्या बैठकित सीबीआय चौकशीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. छत्तीसगडचे मंत्री प्रेम प्रकाश पांडे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली आहे. सेक्स सीडी हे एक राजकीय ...

ठळक मुद्देछत्तीसगडचे मंत्री राजेश मूणत यांच्या कथित सेक्स सीडी प्रकरणाची आता सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. रमण सिंह सरकारने शनिवारी यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली- छत्तीसगडचे मंत्री राजेश मूणत यांच्या कथित सेक्स सीडी प्रकरणाची आता सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. रमण सिंह सरकारने शनिवारी यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. कॅबिनेटच्या बैठकित सीबीआय चौकशीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. छत्तीसगडचे मंत्री प्रेम प्रकाश पांडे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली आहे. सेक्स सीडी हे एक राजकीय षडयंत्र आहे. याआधी राजेश मूणत यांनी ही सीडी बनावट असल्याचं सांगितलं होतं. याप्रकरणी रायपूर पोलिसांच्या एका पथकाने ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या आरोपाखाली पत्रकार विनोद वर्मा यांना अटक केली आहे. 

 

सेक्स सीडी प्रकरणी पत्रकार विनोद वर्मा यांना अटकप्रसिद्ध पत्रकार विनोद वर्मा यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली. गाजियाबादमधील इंदिरापुरम परिसरात असणाऱ्या त्यांच्या घरातून पोलिसांनी विनोद वर्मा यांना अटक केली. रायपूर पोलिसांच्या एका पथकाने ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या आरोपाखाली विनोद वर्मा यांना अटक केली आहे. विनोद वर्मा एक वरिष्ठ पत्रकार असून, त्यांनी बीबीसीसाठी काम केलं आहे. आपल्या छत्तीसगड सरकारमधील मंत्री राजेश मूणत यांची सेक्स सीडी असल्याने अटकेची कारवाई करण्यात आल्याचा आरोप विनोद वर्मा यांनी केला आहे. पोलिसांनी विनोद वर्मा यांच्या घरातून 500 सीडी, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह सापडलं असल्याचं सांगितलं . या सर्व सीडी वाटण्यात येणार होत्या असा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र सीडीमध्ये नेमकं काय आहे याबद्दल सांगण्यास त्यांनी नकार दिला. माझ्याकडे छत्तीसगडचे मंत्री राजेश मूणत यांची सेक्स सीडी आहे. त्यामुळेच छत्तीसगड सरकार माझ्यावर नाराज आहे', असं विनोद वर्मा यांनी न्यायालयात नेलं जात असताना पत्रकारांना सांगितलं. आपल्याला जाणुनबुजून फसवलं जात असल्याचा आरोप विनोद वर्मा यांनी केला आहे. 'ही सीडी पब्लिक डोमेन असून, आपला याच्याशी काही संबंध नाही', असंही त्यांनी सांगितलं आहे. 

सीडी बनावट असल्याचा राजेश मूणत यांचा दावाराजेश मूणत यांनी ही सीडी बनावट असल्याचा दावा केला असून, तुम्हाला हवं असेल त्यांना तपास करायला सांगा असं सांगत आव्हान दिलं. पत्रकार परिषदेत राजेश मूणत यांनी सांगितलं की, 'सोशल मीडियाच्या माध्यमातून मला सीडीबद्दल माहिती मिळाली असून, ही पुर्णपणे बनावट आहे. ज्या एजन्सीला तपास करायला सांगायचं आहे त्यांना सांगा. आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत'. छत्तीसगड भाजपाने विनोद वर्मा यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते पत्रकार आहेत की काँग्रेसचे एजंट असा प्रश्न विचारला आहे.