शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

NIT मधून B.Tech, कोण आहेत राजेश धर्मानी? सुखू मंत्रिमंडळात होणार सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 10:51 IST

Himachal Pradesh Cabinet Expansion : बिलासपूरमधील घुमारवी येथील काँग्रेसचे आमदार राजेश धर्मानी आमि कांगडामधील आमदार यादविंदर गोमा यांना मंत्रिपद मिळणार आहे.

हिमाचल प्रदेशातील मंत्रिमंडळ विस्ताराचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात येत आहे. मंगळवारी (दि.१२) दुपारी मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. यासाठी नवीन मंत्र्यांचा दुपारी शिमला येथील राजभवनात शपथविधी सोहळा होणार आहे. बिलासपूरमधील घुमारवी येथील काँग्रेसचे आमदार राजेश धर्मानी आमि कांगडामधील आमदार यादविंदर गोमा यांना मंत्रिपद मिळणार आहे.

दरम्यान, राजेश धर्मानी हे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या जवळचे मानले जातात. राजेश धर्मानी यांचा जन्म २ एप्रिल १९७२ रोजी बिलासपूरच्या घुमारवी येथे झाला. राजेश धर्मानी हे एनआयटी (NIT) हमीरपूरचे पासआउट आहेत. त्यांनी येथून बी.टेक (सिव्हिल) केले आहे. ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव, युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहिले आहेत. तसेच, आमदार राजेश धर्मानी हे संवेदना चॅरिटेबल सोसायटीचे संस्थापक सदस्य आहेत. ही संस्था गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करते. 

राजेश धर्मानी यांनी २००७ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. या निवडणुकीत त्यांनी काका कर्मदेव यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१२ मध्येही त्यांनी निवडणूक जिंकली. दरम्यान, २०१७ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. बिलासपूर जिल्ह्यातील पाच विधानसभा जागांपैकी काँग्रेसला फक्त घुमारवी जागा जिंकता आली आहे, ही मोठी गोष्ट आहे. याचबरोबर, राजेश धर्मानी यांच्याकडे जवळपास एक कोटी रुपयांची संपत्ती आहे. निवडणुकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली होती.

दरम्यान, राजेश धर्मानी हे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या जवळचे मानले जातात. कारण ते दिवंगत मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या विरोधकांमध्येही होते. राजेश धर्मानी यांना सरकार स्थापनेबरोबरच सुखू यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार होते, पण त्यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे ते पहिल्यांदा झालेल्या मंत्रिपदाच्या शपथविधीलाही गेले नाहीत.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेस