शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

अजब न्याय भाजपाचा... कथुआतील आरोपींचं समर्थन करणाऱ्या आमदाराला मंत्रिपदाची 'बक्षिसी'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 6:00 PM

भाजपा आणि पीडीपी सरकारचा 30 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. या दरम्यान जम्मू-काश्मीर विधानसभा अध्यक्ष कविंद्र गुप्ता आणि दुस-या एका आमदारानं मंत्रिपदाची शपथ घेतली.

जम्मू-काश्मीर- भाजपा आणि पीडीपी सरकारचा 30 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. या दरम्यान जम्मू-काश्मीर विधानसभा अध्यक्ष कविंद्र गुप्ता आणि दुस-या एका आमदारानं मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे कथुआ सामूहिक बलात्कारातील आरोपीच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभाग घेतलेल्या आमदाराच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ टाकण्यात आली.आमदार राजीव जसरोटिया यांना मंत्री बनवण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये चर्चित असलेल्या कथुआ सामूहिक बलात्कारातील आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत राजीव जसरोटिया दिसले होते. तरीही त्यांना मंत्री बनवण्यात आलं आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीनं यासंदर्भात राजीव जसरोटिया यांना काही दिवसांपूर्वी प्रश्नही विचारला होता. त्यावेळी मी रॅलीत सहभागी झालो नसल्याचं जसरोटिया यांनी सांगितलं होतं. खरं तर आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत सहभाग घेतल्यामुळे भाजपाच्या दोन मंत्र्यांना यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला होता. भाजपा मंत्री लाल सिंह आणि चंद्र प्रकाश गंगा यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच राजीनामा दिला होता.या मुद्द्यावरून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही जम्मू-काश्मीर सरकारवर हल्लाबोल केला होता. ओमर अब्दुल्ला यांनी टि्वट करत म्हटलं होतं की, कथुआ सामूहिक बलात्कारातील आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभाग घेतल्यामुळे भाजपाच्या दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. परंतु जो एक आमदार रॅलीमध्ये सामील होता, त्याला मंत्री बनवण्यात आलं आहे. भाजपा आणि मेहबुबा मुफ्ती कथुआ सामूहिक बलात्कारातील भूमिकेवरून संभ्रमावस्थेत का आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपानं जम्मू-काश्मीर विधानसभा अध्यक्ष कविंद्र गुप्ता यांना मंत्री बनवलं आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर