विहिरीत सापडले सहा जणींचे मृतदेह; पाच मुली अन् आईचा समावेश, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 14:43 IST2021-12-05T14:41:05+5:302021-12-05T14:43:47+5:30

सहा जणींचे मृतदेह सापडले; पोलिसांकडून तपास सुरू

in rajasthan Woman Jumped In Well With Five Daughters In Kota | विहिरीत सापडले सहा जणींचे मृतदेह; पाच मुली अन् आईचा समावेश, परिसरात खळबळ

विहिरीत सापडले सहा जणींचे मृतदेह; पाच मुली अन् आईचा समावेश, परिसरात खळबळ

कोटा: राजस्थानच्या कोटामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. आईनं पाच लहान मुलींसह आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. महिलेनं पाच मुलींसह विहिरीत उडी घेतली. विहिरीत घडलेल्या सहा जणींचा मृत्यू झाला. विहिरीतून सहा जणींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. कोटा जिल्ह्यातल्या चेचट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या काल्याखेडी गावात हा प्रकार घडला.

पतीसोबत सातत्यानं होत असलेल्या भांडणामुळे महिलेनं मुलींसह आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आल्याचं कोटा जिल्हा ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पारस जैन यांनी दिली. रविवारी पहाटे महिलेनं मुलींसह विहिरीत उडी घेतली. पाण्यात बुडाल्यानं सहा जणींचा मृत्यू झाला. सध्या पोलीस प्रशासन या घटनेचा तपास करत आहे. एका आईनं पाच लेकींसह स्वत:ला संपवल्यानं परिसरावर शोककळा पसरली आहे.

आत्महत्या केलेल्या आई आणि मुलींची ओळख पटली आहे. महिलेचं नाव बादाम बाई असं आहे. तिचं वय ४५ वर्ष होतं. तिनं ५ मुलींसह (सावित्री, १४ वर्ष, अंजली ७ वर्षे, काजल ५ वर्षे, गुंजन ३ वर्षे, रचना १ वर्ष) जीवन संपवलं. पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढले आहेत. ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. महिलेच्या दोन मुली, गायत्री आणि पूनम जिवंत आहेत. हा प्रकार झाला, त्यावेळी त्या घरात नव्हत्या. या प्रकरणी पोलीस महिलेच्या पतीची चौकशी करत आहेत.

Web Title: in rajasthan Woman Jumped In Well With Five Daughters In Kota