शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये बालविवाहाचीही होणार नोंदणी, विरोधी पक्षाच्या गोंधळादरम्यान विधेयक पारित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 21:21 IST

child marriages: विरोधी पक्षाकडून झालेला जोरदार विरोध आणि गोंधळादरम्यान, शुक्रवारी राजस्थानमधील विधानसभेमध्ये विवाह नोंदणी अनिवार्य संशोधन विधेयक २०२१ पारित करण्यात आले.

जयपूर - विरोधी पक्षाकडून झालेला जोरदार विरोध आणि गोंधळादरम्यान, शुक्रवारी राजस्थानमधील विधानसभेमध्ये विवाह नोंदणी अनिवार्य संशोधन विधेयक २०२१ पारित करण्यात आले. आता राज्यातील प्रत्येक विवाहाची नोंदणी अनिवार्य असेल. मग तो विवाह वैध असो वा अवैध. (child marriages) या विधेयकाबाबतच्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षासह अपक्ष आमदार संयम लोढा यांनी त्याला तीव्र विरोध केला. तसेच विधेयकाला जनमत पाहण्यासाठी परिचालित करण्याची मागणी केली. विरोधी पक्षाची मागणी फेटाळून लावत हे विधेयक सभागृहात आवाजी मतदानाने पारित करण्यात आले. त्याला विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेत मत विभाजनाची मागणी केली. मात्र ती फेटाळण्यात आली. अखेर विरोधी पक्षांनी वेलमध्ये उतरून गोंधळ घातला आणि सभागृहातून वॉक आऊट केला. (Rajasthan will also register child marriages, the bill passed amid opposition turmoil)  

विधेयकावरील चर्चेत बोलताना आमदार अशोक लाहोटी यांनी सांगितले की, यावरून असे वाटते की सरकार बाल विवाहाला परवानगी देत आहे. जर हे विधेयक पारित झाले तर तो विधानसभेसाठी काळा दिवस असेल. त्यामुळे सभागृहाने सर्वसंमतीने तो रोखला पाहिजे. विरोधी पक्ष नेते गुलाबचंद कटारिया यांनी  सांगितले की, हा कायदा एकदम चुकीचा आहे. तसेच तो बनवणाऱ्यांनी योग्य पद्धतीने पाहिला नसेल. हा कायदा बालविवाह अधिनियमाचा अवमान करणारा आहे. त्यामुळे हा कायदा पारित करणे ही चुक असेल. अपक्ष आमदार संयम लोढा यांनीही हा कायदा करताना जनतेला विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. बालविवाहाला जस्टिफाय केल्यास देशासमोर चुकीचे उदाहरण ठेवले जाईल, असे सांगितले. दरम्यान, या विधेयकावर उत्तर देताना मंत्री शांती धारीवाल यांनी विरोधी पक्षांनी घेतलेले अनेक आक्षेप खोडून काढले. धारीवाल यांनी हे विधेयक आणण्यामागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे असल्याचे सांगितले. २००९ मध्ये केवळ जिल्हा विवाह नोंदणी अधिकाऱ्याची तरतूद आहे. मात्र यामध्ये अतिरिक्त जिल्हा विवाह रजिस्ट्रेशन अधिकाऱ्याची आणि ब्लॉक विवाह नोंदणी अधिकाऱ्याची तरतूद जोडण्यात आली आहे. विवाह प्रमाणपत्र एक कायदेशीर कागदपत्र आहे आणि विवाहाची नोंदणी झाल्याने विधवा महिलांशी संबंधित आणि उत्तराधिकारा संबंधीचे प्रश्न सोडवणे सोपे जाईल. धारीवाल यांनी सांगितले की, या नोंदणीमुळे बाल विवाह वैध ठरणार नाहीत तर नोंदणीनंतरही कमी वयाच्या विवाहांवर कारवाई केली जाऊ शकेल. अल्पवयीन मुलगीचा विवाह जर झाला तर ती १८ वर्षांची झाल्यावर विवाह रद्द करू शकते. विवाह प्रौढ असो वा अल्पवयीन त्याची नोंदणी अनिवार्य आहे. त्यासाठीच हे विधेयक आणण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :marriageलग्नRajasthanराजस्थान