शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दुसरीत शिकणा-या चिमुरडीचे हात पाय बांधून शाळेतच सामूहिक बलात्कार, शिपाई ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 17:26 IST

गुरुग्राम येथील प्रद्युम्न हत्येमुळे आधीच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असताना राजस्थानमधील बारमेर येथील सरकारी शाळेत दुसरीत शिकणा-या सहा वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

ठळक मुद्देराजस्थानमधील बारमेर येथील सरकारी शाळेत दुसरीत शिकणा-या सहा वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल केली आहेपीडित मुलीला शाळेतील शौचालयाजवळील रुममध्ये एका टेबलला बांधून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आलादोन शिपायांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे

बारमेर, दि. 15 - गुरुग्राम येथील प्रद्युम्न हत्येमुळे आधीच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असताना राजस्थानमधील बारमेर येथील सरकारी शाळेत दुसरीत शिकणा-या सहा वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार, पीडित मुलीला शाळेतील शौचालयाजवळील रुममध्ये एका टेबलला बांधून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी शाळेतील दोन शिपायांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

पोलिसांनी शाळेमध्ये असणा-या सर्व सीसीटीव्हींची तपासणी केली असून, यासंबंधी शाळेच्या स्टाफची चौकशी केली जात आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून शाळेतच अशा प्रकारे एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याने खळबळ माजली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय विद्यालय जालीपा कँटमध्ये दुसरीत शिकत असलेल्या चिमुरडीच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याची शंका व्यक्त केली.  त्यानंतर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. 

गेल्या आठवड्यात गुरुग्राम येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकणा-या प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याच्या हत्या झाल्याने आधीच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यातच राजस्थानमधील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. पीडित मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शाळा आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी संपुर्ण प्रकरणावर नजर ठेवून आहेत. 

बारमेरचे पोलीस महासंचालक गगनदीप सिंगला यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आई-वडिल तिला घेऊन एका खासगी रुग्णालयात गेले होते. मुलीच्या गुप्तांगात वेदना होत असल्याने डॉक्टरांनी पोलिसांना फोन करुन माहिती  द्या असा सल्ला पालकांना दिला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनीही शाळेत धाव घेतली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांसहित सर्वांची चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही तपासले आहेत. 

मुलीच्या वडिलांनी सामूहिक बलात्काराची तक्रार केली असून पोलिसांनी शाळेतील दोन शिपायांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारStudentविद्यार्थीRajasthanराजस्थान