शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदार फुटण्याची भीती; उदयपूरला पोहचण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 12:11 IST

काँग्रेसनं राज्यसभेसाठी मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना मैदानात उतरवलं आहे.

जयपूर - राजस्थानमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता विजयासाठी रणनीती आखण्याची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसनं या निवडणुकीसाठी खूप सतर्कता बाळगली आहे. आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी उदयपूरच्या एका हॉटेलमध्ये शिफ्ट केले. राज्यसभा निवडणुकीसाठी घोडेबाजार होण्याची भीती काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांना एकत्रित ठेवण्याचा प्लॅन नेत्यांनी बनवला आहे. येत्या १० जूनला राज्यसभा निवडणूक होणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या सर्व आमदारांना हायकमांडनं उदयपूरला पोहचण्याचे आदेश दिलेत. काही आमदार बुधवारीच उदयपूरमध्ये दाखल झाले. तर काही आज होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदारांसोबत, अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षाचे आमदारही जे काँग्रेसला समर्थन करणार आहेत. त्यांनाही उदयपूरच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली. विशेष म्हणजे राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उद्योगपती सुभाष चंद्रा यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षात खळबळ माजली. सुभाष चंद्रा यांना भाजपा आणि आरएलपी यांनी आधीच समर्थन दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण काँग्रेस समर्थक आमदार फुटण्याची भीती काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.

काँग्रेसनं राज्यसभेसाठी मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना मैदानात उतरवलं आहे. तर भाजपाने माजी मंत्री घनश्याम तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. अपक्ष म्हणून सुभाष चंद्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रा हे सध्या हरियाणाच्या कोट्यातून खासदार आहेत. १ ऑगस्ट रोजी त्यांचा कार्यकाळ संपत आहे. 

काय आहे मतांचे गणित?राज्य विधानसभेत १०८ आमदारांसह सत्ताधारी काँग्रेस ४ पैकी २ जागांवर विजय मिळवू शकते. तर भाजपा १ जागेवर सहज विजयी होईल. या ४ जागांमध्ये एका जागेवर सुभाष चंद्रा यांनी दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसची १ जागा अडचणीत आली आहे. काँग्रेसला सुरुवातीला ४१-४१-४१ फॉर्म्युल्याने विजय मिळेल असं वाटत होते परंतु तिसऱ्या जागेसाठी काँग्रेसकडे स्वत:कडे २६ मते आहेत. तिसऱ्या जागेसाठी १५ मतांची पक्षाला आवश्यकता आहे. भाजपाकडे ७१ मते आहेत. त्यांच्याकडे १ जागा जिंकल्यानंतर जास्तीची ३० मते राहतील. त्यामुळे चौथ्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. विधानसभेत १३ अपक्ष आमदार आहेत. इतर पक्षाचे ८ आमदार आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणात ही मते कुणाला मिळतात यावर चौथ्या उमेदवाराचं भवितव्य टिकून आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाRajasthanराजस्थानBJPभाजपा