शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

Rajasthan निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी; 'या' ८ नेत्यांवर सोपविली महत्त्वाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 10:41 IST

Rajasthan Assembly Election 2023 : जयपूरमध्ये भाजपची दोन दिवसीय प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. 

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये यावर्षी अखेरीस विधानसभा निवडणुकांचे (Rajasthan Assembly Election 2023)  रणशिंग फुंकले जाणार आहे. राजस्थानात सत्तापालट करण्यासाठी भाजपकडून (BJP) जोरदार तयारी करण्यात येत आहे. राजस्थानमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजने मोठी खेळी केली असून आठ जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले आहेत. यासोबतच जयपूरमध्ये भाजपची दोन दिवसीय प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठकही सुरू आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे आज (२३ जानेवारी) संध्याकाळी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करणार आहेत. भाजपने विजय आचार्य यांची बिकानेर शहराच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे, तर जलमसिंह भाटी यांच्याकडे बिकानेर ग्रामीण भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, भाजपने उम्मेद सिंह भाया यांना अलवर उत्तर, अशोक गुप्ता यांना अलवर दक्षिण, ऋषी बन्सल यांना भरतपूर, सुशील दीक्षित यांना सवाई माधोपूर, स्वरूप सिंह यांना खारा बाडमेर आणि बाबू सिंह राजगुरू यांना बालोत्राचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने ज्या जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले आहेत, ते जिल्हे पक्षासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहेत. यावेळी भाजपने या जिल्ह्यांमध्ये जातीय समीकरणाची पूर्ण काळजी घेत मते मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. बिकानेरमधील राजपूत व्होट बँक वळवण्याच्या इराद्याने राजकीय समीकरणे हाताळण्यात माहीर असलेल्या जलमसिंह भाटी यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे.

राजस्थानमधील सत्ताबदलावर भाजपची नजरदरम्यान, गेल्या तीन दशकांपासून राजस्थानच्या राजकारणात एक ट्रेंड तयार झाला आहे आणि दर पाच वर्षांनी सत्ता बदलते. भाजप पुन्हा एकदा हा ट्रेंड कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा पाच वर्षांनी सत्तेत परतली आणि अशोक गेहलोत (Ashok Gehlot)पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. त्यामुळे राजस्थानमधील राजकरणाचा ट्रेंड कायम राहतो की, येथील जनतेकडून अशोक गेहलोत यांच्या सरकारला पुन्हा संधी दिली जाणार? हे पाहावं लागणार आहे. राजस्थानची विधानसभा निवडणूक डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मध्ये होणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थानJ P Naddaजगत प्रकाश नड्डा