शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 16:20 IST

पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे14 ऑगस्टपासून राजस्थानात विधानसभा सत्र सुरू होणार असून त्यापूर्वीच सचिन पायलट यांनी सत्रात सहभागी होण्याची संकेत देण्यात आले आहेत.

जयपूर - राजस्थानमध्ये पुन्हा राजकीय घडामोडी घडणार आहेत. काँग्रेसमध्ये बंडखोरी करणारे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आपल्या समर्थक आमदारांसोबत घरवापसी करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सचिन पायलट यांनी सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या तिघांमध्ये झालेली ही भेट सकारात्मक झाल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आज दुपारी 12.30 च्या सुमारास सचिन पायलट यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे 14 ऑगस्टपासून राजस्थानात विधानसभा सत्र सुरू होणार असून त्यापूर्वीच सचिन पायलट यांनी सत्रात सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.

याआधी काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले होते की, राहुल गांधी अद्यापही सचिन पायलट यांना काँग्रेसमध्ये घेण्यास इच्छुक आहेत. दुसरीकडे, अशोक गेहलोत यांनी रविवारी आमदारांना आत्तापर्यंत दाखवल्याप्रमाणे विधानसभेत एकजुटता दाखवण्यास सांगितले आहे.जैसलमेरच्या रिसॉर्टमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्ष आणि पाठिंबा देणार्‍या पक्षांच्या बैठकीत संबोधित करताना अशोक गहलोत म्हणाले, आम्ही सर्व लोकशाहीचे योद्धा आहोत. आम्ही ही लढाई जिंकणार आहोत आणि साडेतीन वर्षानंतरही निवडणुका जिंकू."

याचबरोबर, अशोक गहलोत यांनी सर्व आमदारांना तयारीसह सभागृहात जाण्यास सांगितले व नंतर त्यांच्या संबंधित मतदार संघात जाऊन लोककल्याणकारी कामांची यादी सादर करावी जेणेकरून सरकार त्यावर काम करू शकेल. तसेच, राजकीय घडामोडी आणि राज्यातील कोरोना विषाणू संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करण्याचा विश्वास अशोक गहलोत यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान