शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पायलट अकार्यक्षम, बिनकामाचे; गेहलोत यांच्या टीकेला बंडखोर नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 19:34 IST

Rajasthan Political Crisis: गेहलोत यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती

जयपूर: राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यामधील संघर्ष सुरूच आहे. गेहलोत सातत्यानं पायलट यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. या टीकेला पायलट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पायलट अकार्यक्षम आणि बिनकामाचे असल्याची टीका गेहलोत यांनी केली होती. या टीकेला पायलट यांनी उत्तर दिलं आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत. या आरोपांमुळे मला दु:ख झालं आहे. पण त्यामुळे मला धक्का बसलेला नाही, असं पायलट म्हणाले. माझी प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नांना भाग म्हणून माझ्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. यापुढेही असे आरोप होत राहतील. मात्र मी आत्मविश्वास किंचितही ढळू देणार नाही, असं पायलट यांनी म्हटलं. आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचं पायलट म्हणाले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. 'सचिन पायलट यांना कमी वयातच खूप काही मिळाले होते. मात्र मात्र त्यांनी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ते अकार्यक्षम आहेत, हे मला आधीपासून माहीत होतं,' अशी बोचरी टीका गेहलोत यांनी केली. राजस्थानमधील सत्तासंघर्षात पायलट यांच्यावर आघाडी घेतल्यानंतर आता अशोक गहलोत हे त्यांच्याविरोधात आक्रमक होऊ लागले आहेत. गेहलोत म्हणाले की, आम्ही सचिन पायलट यांच्याबाबत कधीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. राजस्थान हे असं राज्य असावं जिथे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना बदलण्याची मागणी झाली नाही. ते बिनकामाचे आहेत, अकार्यक्षम आहेत, हे आम्हाला माहीत होतं. मात्र आम्ही त्यांच्याविरोधात कधी काही बोललो नाही. आम्ही सर्वांनी त्यांना सन्मान दिला.गेहलोत पुढे म्हणाले की, आता हा जो काही खेळ झाला आहे तो १० मार्चलाच होणार होता. मात्र तेव्हा आम्ही हा प्रकार सर्वांसमोर आणला. सचिन पायलट यांची काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा होती. मोठमोठे कॉर्पोरेट त्यांना फंडिंग करत आहेत. तसेच भाजपाकडूनही फंडिंग केली जात आहे. मात्र आम्ही या सर्व कारस्थानाची पोलखोल केली.सचिन पायलट बिनकामाचे, अकार्यक्षम आणि दगाबाज! अशोक गहलोत यांची शेलक्या शब्दांत टीका

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेस