शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Rajasthan: पायलट गद्दार, ते सीएम कसे होऊ शकतात? गहलोत यांचा पक्षनेतृत्वावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 09:15 IST

Rajasthan:

-शरद गुप्तानवी दिल्ली : राजस्थानमधील काँग्रेसचे संकट आणखी गडद झाले आहे. ज्येष्ठ नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी हे ज्या सचिन पायलट यांच्याबरोबर गुरुवारी मध्य प्रदेशात पदयात्रा करीत होते त्याच पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत गद्दार म्हणत होते. पायलट यांच्या निमित्ताने गहलोत पक्षाच्या नेतृत्वावर निशाणा साधत होते.पायलट यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर मिळून आपले सरकार पाडण्याचा कट रचला होता, असा आरोप एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गहलोत यांनी केला. ते म्हणाले की, २०२०मध्ये पायलट व त्यांच्या सहयोगी आमदारांनी भाजप मुख्यालयाकडून १०-१० कोटी रुपये घेऊन राजस्थान सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. ज्यांना १० आमदारांचासुद्धा पाठिंबा नाही, अशांना मुख्यमंत्री करण्याबाबत पक्ष विचारही करू शकत नाही; परंतु या चुकीसाठी पायलट यांनी ना पक्षाची ना राजस्थानच्या जनतेची माफी मागितली. ती मागितली असती तर ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची मला माफी मागण्याची गरज पडली नसती.

मार्ग खडतरगहलोत यांना माहिती आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मार्ग अवघड आहे; परंतु ते सचिन पायलट यांचा मार्ग आणखी अवघड करू इच्छित आहेत.

अटकेपासून कोणी रोखले? nसचिन पायलट यांच्या समर्थकांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. पुरावे असतील तर अटक करण्यापासून कोणी रोखले?n पक्षाने गहलोत यांना गुजरातचे निवडणूक प्रभारी करून विश्वास टाकला होता. त्याला आज त्यांनी तडा दिला, असे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटcongressकाँग्रेस