शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील 8 जणांना 4 वर्षीय चिमुकल्याने दिला मुखाग्नी; गावावर शोककळा, नेमकं काय झालं..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 15:40 IST

एकीकडे नववर्षाचे जल्लोषात स्वागत सुरू होते, तर दुसरीकडे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका कुटुंबावर काळाने घाला घातला.

एकीकडे राजस्थानमधील लोक नववर्षाचे जल्लोषात स्वागत करत होते, तर दुसरीकडे याच राजस्थानमध्ये नवर्षाच्या पहिल्याच दिवशी एका कुटुंबावर काळाने घाला घातला. एका भीषण रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, यातील 9 जण एकाच गावातील, तर 8 जण एकाच कुटुंबातील होते. जयपूरच्या सामोदमधील 9 जण नववर्षाच्या पहिल्या दिवशी कुलदेवीचे दर्शन घेऊन परतत होते. यावेळी झालेल्या भीषण अपघातात 2 सख्ख्या भावांसह पत्नी आणि मुलांचा मृत्यू झाला. 

एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यूकैलाशचंद आणि सुवालाल यांचे कुटुंब 1 जानेवारी रोजी कुलदेवी मातेचे दर्शन घेऊन त्यांच्या नवीन वाहनाने घरी परतत असताना खंडेला-पलसाणा रस्त्यावर त्यांच्या आधी दुचाकीला आणि नंतर ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात ज्या 12 लोकांचा मृत्यू झाला, यातील 9 जण एकाच गावातील होते. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे, यातील एकाच कुटुंबातील 8 जणांचा तिरडी एकाचवेळी उठली. घरातील चार वर्षीय चिमुकल्याने या आठ जणांना एकाच वेळी मुखाग्नी दिला. हे दृष्य पाहून तिथे उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.

एकाच चितेवर 8 मृतदेह या अपघातात कैलाशचंद यांची दोन मुले विजय व अजय यांच्यासह मुलगी रेखा, विजयची पत्नी राधा, सुवालाल यांच्या दोन सूना पूनम व अनुराधा, नातू आरव व नात निक्कू, शेजारी अरविंद यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर सोमवारी सर्व मृतदेह एकत्र गावात आल्यावर गावात एकच खळबळ उडाली.  घराच्या अंगणात ठेवलेले मृतदेह पाहून गावात नीरव शांतता पसरली. यावेळी 8 तिरड्या एकत्र उचलल्या आणि सर्वांना एकाच चितेवर जाळण्यात आले. अंत्ययात्रेत गावातील शेकडो लोक सामील झाले होते. यावेळी प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द होता... हे राम! 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAccidentअपघातDeathमृत्यू