शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

'त्या' एका निर्णयानं राजस्थानात डबल धमाका; भाजपा, बसपाला जबर धक्का, काँग्रेसला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 3:38 PM

भाजपा आमदाराची याचिका उच्च न्यायालयाकडून रद्द; काँग्रेसला दिलासा

जयपूर- राजस्थानमध्येकाँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपा आमदार मदन दिलावर यांनी दाखल केलेली याचिका राजस्थान उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. बहुजन समाज पार्टीच्या सर्वच्या सर्व ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या पक्षांतराविरोधात दिलावर यांनी याचिका दाखल केली होती. ही याचिका आज न्यायालयानं फेटाळून लावली.राजस्थानातल्या बसपाच्या ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याविरोधात भाजपा आमदार मदन दिलावर यांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे कारवाईची मागणी केली. मात्र जोशी यांनी कोणतीही कारवाई न केल्यानं दिलावर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं याचिका रद्दबातल ठरवली.बसपाची मागणीदेखील रद्दभाजपा आमदार मदन दिलावर यांनी दाखल केलेल्या याचिकेत आपल्यालाही पक्षकार करून घेण्यात यावं अशी मागणी बसपाकडून करण्यात आली होती. त्यावर दिलावर यांचीच याचिका रद्द केली असताना बसपाला पक्षकार करण्याचा प्रश्नच येत नाही, असं न्यायालयानं म्हटलं.काय आहे प्रकरण?बसपाच्या तिकीटावर निवडून आलेल्या लखन सिंह (करोली), राजेंद्र सिंह गुढा (उदयपुरवाटी), दीपचंद खेडिया (किशनगढ बास), जोगेंदर सिंह अवाना (नदबई), संदीप कुमार (तिजारा) आणि वाजिब अली (नगर, भरतपूर) या सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्याविरोधात भाजपा आमदार मदन दिलावर यांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे तक्रार केली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार सर्व सदस्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी दिलावर यांनी केली. मात्र जोशी यांनी कोणतीही कारवाई न केल्यानं दिलावर न्यायालयात गेले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा