शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

Rajasthan Political Crisis: काहीतरी गडबड आहे! बरंच काही सांगून जातंय वसुंधरा राजेंचं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 12:18 IST

दरम्यान, बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत त्या उपस्थित राहिल्या नाहीत. अशा परिस्थितीत राजे यांचं या संपूर्ण प्रकरणावरचं मौन बरंच काही सांगून जात आहे. 

राजस्थानमध्ये मोठ्या घडामोडी घडत असून, राजकीय संकट थांबण्याचे नाव घेत नाहीये. अशोक गहलोत यांच्याविरुद्ध उघड बंड पुकारणा-या सचिन पायलटवर पक्षाने कारवाई केली. असे असूनही पायलट यांनी अजून पुढील रणनीती स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे पायलट यांच्या मनात नक्की काय चाललंय हे कोणालाच माहीत नाही. विशेष म्हणजे भाजपाचीही या सर्वच घटनाक्रमावर बारीक नजर आहे. कारण पक्षातील दिग्गज नेते सातत्याने अशोक गेहलोत यांना लक्ष्य करीत आहेत. पण या सर्व उलाथापालथीवर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या वसुंधरा राजे गप्प आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या सुंदोपसुंदीवर वसुंधरा राजेंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत त्या उपस्थित राहिल्या नाहीत. अशा परिस्थितीत राजे यांचं या संपूर्ण प्रकरणावरचं मौन बरंच काही सांगून जात आहे. राजस्थान कॉंग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आलेला असताना वसुंधरा राजे यांच्या शांत राहण्यानं भाजपामध्ये सगळंच सुरळीत सुरू आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण काँग्रेस सरकारमध्ये तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथुर, गुलाबचंद कटारिया यांच्यासह अनेक दिग्गज नेते गेहलोत सरकारवर हल्लाबोल करत आहेत. विशेष म्हणजे वसुंधरा राजे या संपूर्ण प्रकरणापासून अंतर राखून आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत, पण तरीही वसुंधरा राजे यांनी अद्याप गेहलोत सरकार किंवा कॉंग्रेसमधल्या अंतर्गत वादावर प्रतिसाद दिलेला नाही. सचिन पायलट यांना पक्षात घेण्यासाठी ज्या पद्धतीने भाजपाचे नेते प्रयत्नशील दिसत होते, परंतु वसुंधरा राजे यासाठी तयार नसल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण राजस्थान भाजपावर राजे यांचे वर्चस्व आणि प्रभुत्व आहे. त्यांना नाराज करणं हे भाजपालाही परवडण्यासारखं नाही. हेच कारण आहे की, राजस्थान भाजपात घेण्यापूर्वी हायकमांड सर्व बाबींचा सखोल विचार करत आहे. त्यामुळे भाजपाची स्थिती सध्या वेट अँड वॉचसारखी आहे. सचिन पायलटच्या पुढच्या डावपेचांच्या भाजपा प्रतीक्षेत आहे. जेणेकरून राजस्थान विधानसभेत भाजपा फ्लोअर टेस्टची मागणी करू शकेल. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या अशोक गेहलोत यांचे अल्पमतात आलेले सरकार वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचा आरोप एनडीएच्याच सहयोगी पक्षाचे नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हुनमान बेनीवाल यांनी केला आहे. राजे यांनी काँग्रेसच्या अनेक आमदारांना स्वत: फोन करून माघारी फिरण्यास सांगितले आहे. बेनिवाल एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी वसुंधरा राजेंनी फोन केलेल्या दोन आमदारांचेही नाव घेतले आहे. वसुंधरा राजे राजस्थान काँग्रेसमधील जवळच्या आमदारांना फोन करून गेहलोत यांना पाठिंबा देण्यास सांगत आहेत. यामध्ये सीकर आणि नागौर जिल्ह्यातील दोन जाट आमदारांना त्यांनी पायलट यांच्यापासून दूर राहण्यास सांगितले. याचे पुरावे आपल्याकडे आहेत. जनता वसुंधरा राजे आणि गेहलोत यांची युती पुरती समजली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महत्त्वाचे म्हणजे आता सचिन पायलट यांनीदेखील राजे आणि गेहलोत यांच्या राजकीय मैत्रीवर वक्तव्य केले आहे.  दुसरीकडे वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्षाने अद्याप त्यांच्याशी राज्यातील राजकीय घडामोडींबद्दल काहीही चर्चा केलेली नाही. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून कोणत्याही प्रतिसादाचा प्रश्नच उद्भवत नाही. असेही म्हटले जात आहे की, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत वसुंधरा राजे यांच्याशी कोणतीही चर्चा न करता उमेदवारांची घोषणा केली गेली, त्यामुळे वसुंधरा राजे संतप्त झाल्या आहेत. आता वसुंधरा राजे यांच्याशी चर्चा न करता सचिन पायलटबाबत पक्षाने काही निर्णय घेतल्यास पक्षाला हे जड जाऊ शकते. अशा परिस्थितीत भाजपची पुढची योजना काय असेल?, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. 

हेही वाचा

नशीब फळफळलं!...अन् ती महिला रातोरात झाली करोडपती

गेहलोत सरकार पाडण्याचं केंद्रातल्या मंत्र्यांचं षडयंत्र, त्यांना अटक करा- सुरजेवाला

CoronaVirus News : तंत्रज्ञानाचा आविष्कार! IIT मद्रास अन् स्टार्टअपनं मिळून बनवलं फोल्ड होणारं पोर्टेबल कोरोना रुग्णालय

खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा

CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क

कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना

टॅग्स :Rajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोत