खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 09:30 AM2020-07-17T09:30:29+5:302020-07-17T09:33:25+5:30

बीजिंगच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणाविरोधात ते आपल्या मित्र देशांच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करतील. यासाठी ते हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत मित्र देशांच्या मदतीला उभे राहतील. 

america will stand with friends for upholding sovereignty in south china sea | खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा

खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा

googlenewsNext

वॉशिंग्टनः चीन सातत्यानं आक्रमक भूमिका घेत असल्यानं अमेरिकाही सतर्क झाला आहे. तसेच चीन गेल्या काही दिवसांपासून रशियाबरोबर मैत्री वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. विशेष म्हणजे जिनपिंग अन् पुतिन मिळून एक घातक शस्त्र तयार करत असल्याचीही माहिती समोर आली होती. त्यामुळे नाटो देशांची चिंता वाढली होती. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनं चीनला पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने असे म्हटले आहे की, बीजिंगच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणाविरोधात ते आपल्या मित्र देशांच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करतील. यासाठी ते हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत मित्र देशांच्या मदतीला उभे राहतील. 

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या पूर्व आशियाई आणि पॅसिफिक प्रकरणाचे सहाय्यक सचिव डेव्हिड आर. स्टिलवेल म्हणाले की, दक्षिण चीन समुद्राच्या मुद्द्याचा थेट परिणाम आर्क्टिक, हिंदी महासागर, भूमध्य आणि इतर महत्त्वाच्या जलमार्गांवर होतो. दक्षिण चीन समुद्रातील धोक्याचा थेट परिणाम समुद्राच्या स्वातंत्र्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक राष्ट्र आणि व्यक्तीवर होत असतो. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या पूर्व आशियाई आणि पॅसिफिक प्रकरणाचे सहाय्यक सचिव डेव्हिड आर. स्टेलवेल म्हणाले की, अलिकडच्या काही महिन्यांत जगाने कोरोनाविरोधातल्या लढाईवर लक्ष्य केंद्रित केलं आहे. त्याचदरम्यान चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनानं दक्षिण चीन समुद्रातील आपल्या हालचाली अधिक वेगवान  केल्या आहेत. त्यांना वाटतं ते बरोबर करत आहेत, पण याचे त्यांना परिणाम भोगावे लागू शकतात, असंही डेव्हिड आर. स्टेलवेल यांनी सांगितलं आहे.

 

चीनला पाश्चात्य देशांमध्ये आपला प्रभाव वाढवायचा आहे
नाटो देशांना चीनशी संघर्ष टाळण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी काम करण्यास सांगितले गेले आहे. चीनने हाँगकाँगवर कडक कायदे लादले आहेत. चीनला आता पाश्चात्य देशांमध्ये आपला प्रभाव वाढवायचा आहे. माजी संरक्षण सचिव लॉड रॉबर्टसन म्हणाले की, अत्यंत आक्रमक चीन आणि रशिया नवीन धोके निर्माण करीत आहेत. अशा परिस्थितीत नाटोला या अधिक शक्तिशाली होऊन पूर्ण तयारी करण्याची गरज आहे. पेपरात असे म्हटले आहे की, रशिया हा नेहमीच नाटोचा 'शत्रू' राहिला आहे, परंतु चीनचा नवा उदय आणि वाढत्या लष्करी सामर्थ्याने 21व्या शतकात नवीन चिंतांना जन्म दिला आहे. चीन आपला संरक्षण खर्च 6.6 टक्क्यांनी वाढवणार आहे. चीनचे अध्यक्ष सन 2035पर्यंत चीनच्या लष्कराचे आधुनिकीकरण करण्यात गुंतले आहेत. सन 2049 पर्यंत चीनच्या सैन्याला जागतिक दर्जाचे बनविण्याची त्यांची योजना आहे. चीन आणि भारत, जपान यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. ड्रॅगन हिमालयातून दक्षिण चीन समुद्राकडे सरकला असून, तैवान, व्हिएतनामसारख्या छोट्या शेजारील देशांना वारंवार धमकावत आहे. 

हेही वाचा

CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क

कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना

बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी 

धोका वाढला! 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार; IIScचा गंभीर इशारा

देशासाठी 10 वर्षांहून कमी काळ सेवा देणार्‍या जवानांनाही मिळणार पेन्शन; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

Web Title: america will stand with friends for upholding sovereignty in south china sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.