शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

राजस्थान संकट : पायलटांच्या मनधरणीसाठी प्रियंका गांधी पुन्हा सक्रिय, 'या' दोन नेत्यांकडे जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 14:42 IST

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये स्पष्टपणे फूट पडल्याचे दिसत आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटिशीविरोधात बंडखोर आमदारांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला असून, यावर 3 वाजता सुनवणी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

ठळक मुद्देबंडखोर आमदार विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीविरोधात उच्च न्यायालयातकाँग्रेस नेते सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार हरियाणातील मानेसरमधील एका रिसॉर्टमध्ये थांबलेले आहेत.बुधवारी विधानसभा अध्यक्ष डॉ. सीपी जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसच्या 19 आमदारांना नोटिस पाठवून 17 जुलैपर्यंत स्पष्टिकरण देण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली - राजस्थानातील राजकीय संकटात आपले सरकार वाचवण्यात अशोक गेहलोतांना यश आले आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या अडचणी दूर झालेल्या नाहीत. आता या प्रकरणात प्रियंका गांधी वाड्रा पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. प्रियंका गांधी यांनी केसी वेणुगोपाल आणि अहमद पटेलांना सचिन पायलट यांच्याशी बोलायला सांगितले आहे. तसेच पक्षात परत यायला सांगितले आहे. तसेच पायलट गटातील आमदारांनाही फोन करून परत येण्यास सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र, अशोक गेहलोत अद्यापही आपल्याच आविर्भावात आहेत.

बंडखोर आमदार विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीविरोधात उच्च न्यायालयात  -सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये स्पष्टपणे फूट पडल्याचे दिसत आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटिशीविरोधात बंडखोर आमदारांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला असून, यावर 3 वाजता सुनवणी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. बुधवारी विधानसभा अध्यक्ष डॉ. सीपी जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसच्या 19 आमदारांना नोटिस पाठवून 17 जुलैपर्यंत स्पष्टिकरण देण्यास सांगितले आहे. सरकारचे भविष्य काहीही असो, मात्र ही अत्यंत कठीन स्थिती आहे, असे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. 

क्वारंटाइन सेंटर बनले पायलट गटाचे रिसॉर्ट -काँग्रेस नेते सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार हरियाणातील मानेसरमधील एका रिसॉर्टमध्ये थांबलेले आहेत. असा दावा केला जातो, की ते ज्या रिसॉर्टमध्ये थांबले आहेत, ते क्वारंटाइन सेंटर आहे. रात्रितून घडलेल्या या घटनेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. काँग्रेसने आज या बंडखोर आमदारांना हरियाणा भाजपा सरकारच्या संरक्षणातून बाहेर यऊन जयपूरला परत येण्याचे सांगितले आहे. बेस्ट वेस्टर्न रिसॉर्टबाहेर क्वारंटाइन सेंटर असे लिहिले आहे. कुठल्याही बाहेरील व्यक्तीला आत जाण्याची परवानगी नाही. गेटवर उपस्थित सुरक्षा रक्षकाचे म्हणणे आहे, की आत कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

कमी वयात दिल्या मोठ्या जबाबदाऱ्या -सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून काढल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले होते, "सचिन पायलट यांना काँग्रेसने कमी वयात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. त्यांना अगदी कमी वयात जी राजकीय ताकद दिली गेली, तेवढी तागद कदाचित कुणालाही दिली गेली नसेल. 2003 मध्ये सचिन पायलट राजकारणात आले. यानंतर 26 वर्षांचे असतानाच 2004 मध्ये त्यांना काँग्रेसने खासदार बनवले. 32 वर्षांचे असताना त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले. 34 वर्षांचे असतानाच त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची दबाबदारी दिली गेली. 40 व्या वर्षी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा आशिर्वाद सदैव त्यांच्यासोबत होता.''

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: चिंताजनक!; कोरोनाने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत 606 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती गंभीर

गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात

"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलटPriyanka Gandhiप्रियंका गांधीAshok Gahlotअशोक गहलोत