शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बहिणीकडे जाण्याचा हट्ट,पतीने पत्नीला बाईकला बांधत फरफटत नेलं; मित्राने व्हायरल केला VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 16:22 IST

राजस्थानमध्ये पतीने पत्नीला बाईकच्या मागे बांधून जनावरासारखे ओढून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

Rajasthan Crime :राजस्थानातून माणुसकीला लाजवेल आणि पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. राजस्थानमध्ये एका व्यक्तीने आपल्याच पत्नीसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पतीने पत्नीला मोटारसायकलला बांधून संपूर्ण गावात फरफटत नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. दरम्यान हा व्हिडीओ महिन्याभरापूर्वीचा असल्याचे म्हटलं जात आहे.

राजस्थानच्या नागौरमध्ये आरोपी पतीने पत्नीला मोटारसायकलच्या मागे दोरीने बांधून गावात फरफटत नेले. हा सगळा प्रकार घडताना महिलेला वाचवण्याची तसदी कोणी घेतली नाही. सगळे त्याचे व्हिडिओ बनवत राहिले. मात्र रविवारी एका वादातून हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि आरोपी पती प्रेमाराम मेघवाल याला अटक झाली. ही घटना महिन्याभरापूर्वी घडली होती आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला.

पंचौरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक सुरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एक महिन्यापूर्वी नहरसिंहपुरा गावात घडली होती. आरोपी  प्रेमराम मेघवाल (३२) याने पत्नीला मोटारसायकलच्या मागे दोरीने बांधून गावात ओढूत नेले. कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला, जो काल ऑनलाइन समोर आला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीला अटक केली. पीडिता सध्या तिच्या नातेवाइकांकडे राहत असून या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमराम मेघवाल याच्या लग्नाला फक्त १० महिने झाले आहेत, मात्र तो पत्नीला सतत मारहाण करत असे. पत्नीने महिनाभरापूर्वी बारमेर येथे बहिणीच्या घरी जाण्याचा हट्ट धरला होता. पतीच्या नकारानंतरही ती गेली. यामुळे तो इतका संतापला की त्याने पत्नीला मोटरसायकलच्या मागे बांधून तिला ओढून नेण्यास सुरुवात केली.

महिन्याभराने व्हिडीओ आला समोर

दरम्यान, रविवारी संध्याकाळी दारू पिऊन प्रेमरामचे त्याच्या एका मित्राशी भांडण झाले होते. तेव्हा त्या मित्राने प्रेमरामचा हा व्हिडिओ व्हायरल केला होता.  त्यानंतर पंचौरी पोलीस स्टेशन परिसरात आणि नागौर मुख्यालयात खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रेमरामला अटक केली.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरल