राजस्थानमध्ये कोसळले MiG 27 विमान, पायलट सुखरूप

By Admin | Updated: June 13, 2016 12:31 IST2016-06-13T12:26:16+5:302016-06-13T12:31:41+5:30

राजस्थानच्या जोधपूरमध्ये सोमवारी दुपारीमिग-२७ विमान कोसळून दोन घरे जमीनदोस्त झाली.

Rajasthan crashed MiG 27 aircraft, pilot safely | राजस्थानमध्ये कोसळले MiG 27 विमान, पायलट सुखरूप

राजस्थानमध्ये कोसळले MiG 27 विमान, पायलट सुखरूप

ऑनलाइन लोकमत 
जोधपूर, दि. १३ - देशातील मिग विमान कोसळून दुर्घटनाग्रस्त झाल्याच्या घटना वाढतच आहेत. सोमवारी दुपारी राजस्थानमधील जोधपूर भागात एका MiG 27 विमान कोसळले असून सुदैवाने वैमानिक सुखरुप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जोधपूर शहरातील कु़डी भगतसनी भागात हे विमान कोसळल्याने त्या परिसरातील दोन घरे जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे. 
ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. 
 

Web Title: Rajasthan crashed MiG 27 aircraft, pilot safely