शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

टोल वाचवायच्या नादात ड्रायव्हरनं रेल्वे ट्रॅकवर चढवली बोलेरो, तेवढ्यात मालगाडी आली; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 14:01 IST

प्रत्यक्षदर्शिंनी सांगितल्यानुसार, टोल वाचविण्याच्या नादात बोलेरो चालकाने मुख्य रस्ता सोडून रेल्वे ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा अपघात घडला.

राजस्थानातील फलौदी येथे एका ड्रायव्हरला हलगर्जीपणा अत्यंत महागात पडला. ड्रायव्हरने टोल वाचविण्यासाठी आपली बोलेरो थेट रेल्वे ट्रॅकवरच चढवली आणि ती अडकली. याच दरम्यान, मालगाडी आली आणि बोलेरोला जबरदस्त धडकली. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

मालगाडीने बोलेरो उडवली -ही घटना फलोदीतील खिरवा टोल नाक्याजवळ घडली. ड्रायव्हरने टोल वाचविण्याच्या नादात बोलेरो रोड सोडून कच्च्या रस्त्याने रेल्वे ट्रॅकवर नेली. पण ती रेल्वे ट्रॅकवरच अडकली. तेव्हाच एक मालगाडी आली. ती वेगात होती आणि तिने पाहता पाहता बोलेरोला धडक दिली. ही धडक एवढी भीषण हेती, की बोलेरोचा पार चुराडा झाला. मात्र, या अपघातात ट्रेनला अथवा बोलेरोतील कुठल्याही व्यक्तीचे नुकसान झाले नाही. कारण रेल्वे येण्यापूर्वीच बोलेरोतील लोक उतरले होते.

प्रत्यक्षदर्शिंनी सांगितल्यानुसार, टोल वाचविण्याच्या नादात बोलेरो चालकाने मुख्य रस्ता सोडून रेल्वे ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शिंनीच मालगाडी आणि बोलेरोचा हा व्हिडिओ तयार केला आहे. 

दूर जाऊन पडली बोलेरो -प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले, की गाडी ट्रॅकवर अडकल्यानंतर त्यात बसलेल्या लोकांनी तिला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न सुरू असतानाच त्यांना फलौदीकडून मालगाड़ी येताना दिसली आणि ते दूर पळाले. अपघातानंतर ही बोलेरो जवळपास वीस फूट दूर जाऊन पडली होती आणि मालगाडी जवळपास दोन तास घटनास्थळीच उभी होती. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAccidentअपघातrailwayरेल्वेpassengerप्रवासी