शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान जगातील पहिला आदिवासी नेता- भाजप आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 11:01 IST

जगभरात हनुमानाची सर्वाधिक मंदिरं असल्याचा दावा

जयपूर: जवाहरलाल नेहरु विद्यापीठात दररोज 3 हजार कंडोम सापडतात, असं वादग्रस्त विधान करणारे भाजपा आमदार ज्ञानदेव अहुजा आता नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. हनुमान जगातील पहिले आदिवासी नेता होता, असं वक्तव्य अहुजा यांनी केलंय. हनुमानाचा अपमान करणाऱ्या घटनेचा संदर्भ देऊन अहुजा बोलत होते. 'हनुमान यांनी पहिले आदिवासी नेते म्हणून पृथ्वीवर जन्म घेतला. त्यामुळेच जगभरात मोठ्या प्रमाणात हनुमानाची मंदिरं पाहायला मिळतात. त्यामुळे आपण हनुमानाचा अपमान करु नये,' असं अहुजा यांनी म्हटलं. 'हनुमानजी जगातील पहिला आदिवासी नेता होता. आदिवासी समाजातील पहिले संत म्हणूनदेखील हनुमान यांचं नाव घेता येईल. भगवान राम चित्रकूटाच्या दिशेनं जात असताना हनुमानजींनी आदिवासींचं सैन्य तयार केलं. या सैन्याला भगवान रामानं प्रशिक्षण दिलं होतं,' असं अहुजा म्हणाले. ज्ञानदेव अहुजा रामगढ विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. जगभरात हनुमानाची 40 लाख मंदिरं असल्याचा दावादेखील त्यांनी केला. याआधी ज्ञानदेव अहुजा जेएनयूमधील विद्यार्थ्यांबद्दल केलेल्या विधानांमुळे चर्चेत आले होते. जेएनयू म्हणजे सेक्स आणि ड्रग्जचा अड्डा असल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. जेएनयूमध्ये दररोज 3 हजार कोटी कंडोम आणि 2 हजार दारुच्या बाटल्या सापडतात. याठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा गैरकृत्यांमध्ये सहभाग असतो, असं अहुजा यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारPoliticsराजकारण