शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! दारू समजून प्यायले भांडी घासण्याचं लिक्विड; ३ महिलांसह ४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:02 IST

एका लग्न समारंभाचं काम संपवून घरी परतलेल्या चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.

राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलोली गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका लग्न समारंभाचं काम संपवून घरी परतलेल्या चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या चौघांनी भांडी घासण्यासाठी वापरलं जाणारं घातक केमिकल (लिक्विड) दारू समजून प्यायलं होतं.

या घटनेमुळे प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या चौघांनी भांडी घासण्याचं घातक लिक्विड दारू समजून प्यायलं होतं. रात्री प्रकृती बिघडल्यानंतर तिघांचा गंगापूर रुग्णालयात मृत्यू झाला, तर एका महिलेचा भीलवाडा येथील महात्मा गांधी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्हाधिकारी जसमीत सिंह संधू आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धर्मेंद्र यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच एफएसएल (FSL) टीमही तपासासाठी दाखल झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रतन, सुशीला देवी, जमनी देवी आणि बदामी देवी यांनी तीन दिवसांपूर्वी आलोली येथे शैतान सिंह यांच्याकडील एका विवाह समारंभात भांडी घासण्याचं काम घेतलं होतं. काम पूर्ण झाल्यानंतर ते तेथील भांडी साफ करण्याचं लिक्विड दारू समजून आपल्यासोबत घरी घेऊन आले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, नशा करण्याच्या नादात त्यांनी हे लिक्विड दारू समजून प्यायलं, ज्यामुळे या चौघांचाही मृत्यू झाला.

या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी पोहोचून मृतांच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात पाठवला आहे. एकाच वेळी झालेल्या या चार मृत्यूंच्या बातमीने पोलीस, प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि एफएसएल तपासणीनंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील. सध्या या प्रकरणी दोषी आणि बेकायदेशीर ॲसिड विक्रेत्यांची चौकशी केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy: Four Die After Mistaking Dish Soap for Liquor

Web Summary : In Rajasthan, four people died after mistakenly drinking dishwashing liquid, believing it was alcohol. The incident occurred after a wedding event, triggering investigations and causing widespread concern in the area.
टॅग्स :Rajasthanराजस्थानDeathमृत्यूPoliceपोलिस