शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

'भाजपानं देशाला दिलेत तीन मोदी ; नीरव, ललित अन् अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 1:37 PM

पंजाब सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देनवज्योतसिंग सिद्धूंचा भाजपावर निशाणाभाजपा 3 मोदी दिले;नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदीकाँग्रेसनं आपल्याला चार गांधी दिलेत - सिद्धू

जयपूर : पंजाब सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. प्रचारसभेदरम्यान नवज्योतसिंग सिद्धू यांनी परदेशात पळ काढणारे कर्जबुडवे उद्योगपती नीरव मोदी आणि ललित मोदीवरुन भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले की, काँग्रेसनं आपल्याला चार गांधी दिले आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीनं तीन मोदी दिले आहेत, नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी.  नवज्योतसिंग सिद्धूंच्या या टीकेला भाजपा काय प्रत्युत्तर देणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठीच्या 200 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

दुसरीकडे, करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावण्यासाठी सिद्धू पाकिस्तानला गेल्याने निर्माण झालेला वाद ताजा असतानाच त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानला पाठविलेले नव्हते, असे नवे स्पष्टीकरण नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी दिले आणि आधीच्या आपल्या वक्तव्यावरून त्यांनी घूमजाव केले. करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावण्यासाठी सिद्धू पाकिस्तानला गेल्याने वाद निर्माण झाला आहे. पण ‘राहुल गांधी यांनीच आपल्याला पाकिस्तानला जायला सांगितले होते, असा दावा सिद्धू यांनी केला होता. त्यावरून नवा वाद निर्माण होताच, सिद्धू यांनी घूमजाव केले.

 

शिवाय, अमरिंदर सिंग हे माजी लष्कर कॅप्टन आहेत. याचा संदर्भ घेऊन सिद्धू यांनी म्हटले होते की, राहुल गांधी हेच माझे कॅप्टन आहेत. यावरुन तृप्त राजेंद्र सिंग बजवा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी करत म्हटले की, सिद्धू हे अमरिंदर यांना कॅप्टन समजत नसतील, तर त्यांनी नैतिक जबाबदारीनुसार मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक