शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Rajasthan Assembly Election Results Live: राजस्थानचा काँग्रेसला 'हात'? बहुमताकडे दमदार वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 10:56 IST

राज्यात विधानसभा निवडणूक 2018; राज्यात कमळ कोमेजण्याची शक्यता

जयपूर: राजस्थानात भाजपाचं कमळ कोमेजताना दिसतं आहे. निवडणुकीचे सुरुवातीचे कल पाहता काँग्रेसनं बहुमताचा आकडा पार केला आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. यापैकी 100 पेक्षा अधिक जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजपा 80 मतदारसंघात पुढे आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट आघाडीवर आहेत. तर मुख्यमंत्री वसुंधरा राजेदेखील पुढे आहेत. राजस्थानची जनता दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलते, असा इतिहास आहे. तोच इतिहास कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत तब्बल 163 जागा जिंकणाऱ्या भाजपाला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. तर मागील निवडणुकीत केवळ 21 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची बहुमताच्या दिशेनं दमदार वाटचाल आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन्ही नेत्यांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती. हे दोन्हीही नेते सध्या आघाडीवर आहेत. गेहलोत सरदारपुरामधून पुढे आहेत. तर पायलट यांनी टोंकमधून आघाडी घेतली आहे. राज्यात भाजपा पिछाडीवर असली तरी, मुख्यमंत्री वसुंधरा राजे झालरपाटण मतदारसंघातून पुढे आहेत. काँग्रेसनं त्यांच्याविरोधात मानवेंद्र सिंह यांना रिंगणात उतरवलं होतं. जसवंत सिंह यांचे चिरंजीव असलेल्या मानवेंद्र यांना काँग्रेसनं शिवऐवजी झालरपाटणमध्ये वसुंधरा राजेंविरोधात उमेदवारी दिली. मात्र ते सध्या पिछाडीवर आहेत. भाजपानं राज्यात केवळ एकच मुस्लिम उमेदवार दिला होता. भाजपानं टोंकमधून युनूस खान यांना उमेदवारी दिली होती. मात्र तेदेखील पिछाडीवर आहेत.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालBJPभाजपाcongressकाँग्रेस