शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

Rajasthan Assembly Election: 'इकडे' जो हरणार तो राजस्थानवर राज्य करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 10:36 AM

राजस्थानच्या राजकारणातला अजब मतदारसंघ पुन्हा चर्चेत

जयपूर: निवडणूक म्हटली की प्रत्येक मतदारसंघ जिंकण्यासाठी राजकीय पक्ष ताकद लावतात. मात्र राजस्थानात असाही एक मतदारसंघ आहे, जो गमावला तर भाजपा, काँग्रेसला आनंदच होईल. कोटा जिल्ह्यातील हिंडोली विधानसभा मतदारसंघ आणि राज्यातील राजकीय स्थिती मोठी अजब आहे. 'हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं' हा बाजीगर चित्रपटातील डायलॉग इथे अगदी परफेक्ट लागू होतो. जो पक्ष हिंडोली विधानसभा मतदारसंघ जिंकतो, त्या पक्षाला राज्यात सरकार स्थापन होत नाही, असं इतिहास सांगतो. त्यामुळे राज्यभरात विजयासाठी ताकद पणाला लावणारे राजकीय पक्ष हिंडोली जिंकण्यासाठी मात्र फारसा जोर लावत नाही. उलट हिंडोलीत आपला पराभव व्हावा, अशीच भाजपा, काँग्रेसची इच्छा असते. गेल्या 28 वर्षांचा इतिहास लक्षात घेतल्यास हा योगायोग दिसून येतो. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2013 मध्ये काँग्रेसचे अशोक चांदना हिंडोली मतदारसंघातून विजयी झाले. मात्र काँग्रेसला राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. 200 जागा असलेल्या राजस्थानात काँग्रेसला 25 जागादेखील मिळाल्या नाहीत. 1990, 1993 आणि 2003 मध्ये हिंडोलीत काँग्रेसचा झेंडा फडकला. मात्र राज्यात कमळ फुललं आणि भाजपाला सत्ता मिळाली. 2008 मध्ये या मतदारसंघात कमळ उमललं. मात्र राज्यातील जनतेनं काँग्रेसला हात दिला. त्यामुळे भाजपाला सत्ता सोडावी लागली. 1998 मध्ये मात्र हा योगायोग पाहायला मिळाला नाही. त्यावेळी हिंडोलीत काँग्रेसचा उमेदवार जिंकला आणि राज्यातही काँग्रेसलाच सत्ता मिळाली. मात्र काही महिन्यातच इथे पोटनिवडणूक झाली आणि भाजपानं सरशी साधली. मात्र राज्यातील काँग्रेसची सत्ता कायम राहिली. त्यामुळे यावेळी हिंडोलीतील जनता कोणाला साथ देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी