शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान : अजय माकन यांच्या अहवालात बंडखोरांवर कारवाईची शिफारस, प्रदेशाध्यक्षांची गच्छंती शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 06:53 IST

 काँग्रेस अध्यक्षांना पाठविला अहवाल.

आदेश रावल नवी दिल्ली : राजस्थानचे सरचिटणीस प्रभारी अजय माकन यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना अहवाल पाठविला आहे. अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या अहवालात बंडखोरांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस केली आहे. 

काँग्रेस अध्यक्षही अशोक गहलोत यांच्यावर नाराज आहेत. दोन्ही निरीक्षकांनी सांगितले की, शांती धारीवाल, महेश जोशी आणि प्रताप सिंह खाचरियावास यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई व्हायला हवी. तसेच, राजस्थानचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांना हटविण्याची शिफारसही करण्यात आली आहे. डोटासरा हे गहलोत यांचे निकटवर्तीय समजले जातात. 

सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस नेतृत्व लवकरच या नेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी करू शकते. नोटिसीमध्ये विचारणा करण्यात येईल की, विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविण्यात आली तेव्हा त्याचवेळी दुसरी बैठक का बोलविण्यात आली. आमदारांना का भ्रमित करण्यात आले. दरम्यान, सचिन पायलट हे जयपूरहून दिल्लीला दाखल झाले आहेत. असे सांगण्यात येत आहे की, सचिन पायलट हे सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करतील. 

२० आमदार गेहलाेत यांना भेटलेराजस्थानच्या २० आमदारांनी अशाेक गेहलाेत यांची मुख्यमंत्री निवासस्थानी पुन्हा भेट घेतली. त्यात काही मंत्र्यांचाही समावेश आहे. सध्याच्या राजकीय संकटाशी या भेटीचा संबंध जाेडण्यात येत आहे. पक्षाकडून काेणतीही नाेटीस मिळाल्यास उत्तर देण्याची तयारी आमदारांची आहे.

आम्ही एकनिष्ठ नसतो, तर सरकार पडले असते : जोशीराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या समर्थकांनी वेगळी बैठक घेण्याला शिस्तभंग म्हटले जात आहे. यावर सरकारचे मुख्य प्रतोद डॉ. महेश जोशी यांनी म्हटले आहे की, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. जर आम्ही एकनिष्ठ राहिलो नसतो तर राज्यातील काँग्रेस सरकार केव्हाच पडले असते.

ए. के. एंटाेनी यांना तातडीने केले पाचारणकाँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष ए. के. एंटाेनी यांना दिल्लीत तातडीने बाेलाविण्यात आले आहे. राजस्थानातील घटनाक्रमानंतर अजय माकन यांनी दिलेल्या अहवालावर कारवाई करण्याबाबत एंटाेनी यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस