शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:06 IST

Rajasthan Accident News: सासू, पाच सुना आणि मुलगी अशा  एकाच कुटुंबातील सात महिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. फतेहपूर शेखावटी येथे झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळावरील विदारक दृश्य पाहून पाहणाऱ्यांचे मन हेलावले आणि डोळ्यांत पाणी आले.

सासू, पाच सुना आणि मुलगी अशा  एकाच कुटुंबातील सात महिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. फतेहपूर शेखावटी येथे झालेला हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळावरील विदारक दृश्य पाहून पाहणाऱ्यांचे मन हेलावले आणि डोळ्यांत पाणी आले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार या कुटुंबाच्या नात्यातील एका महिलेचं निधन झालं होतं. तिच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होऊन हे कुटुंबीय काही वाहनांमधून माघारी परतत होते. त्यात या सर्व महिला एका कारमध्ये बसल्या होत्या. ही कार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर हरसावा गावाजवळ आली असताना कारच्या चालकाने भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही कार आधी एका पीकअपवर आदळली आणि तशीच फरफटत जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकमध्ये घुसली.

या अपघातात कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला. तसेच कारमधून प्रवास करणारी वृद्ध सासू, पाच सुना आणि मुलगी अशा मिळून ७ जणांचा मृत्यू झाला. तर एक तरुणी आणि ड्रायव्हर गंभीर जखमी झाले.  मृतांमध्ये सासू मोहिनी देवी आणि चंदा देवी, तुलसी देवी, बरखा देवी, आशा देवी, संतोष देवी या सुना आणि इंदिरा या मुलगीचा समावेश होता. तर सोनू आणि कारचालक वसीम हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हरसावा गावाजवळ ही कार पोहोचली असतानाच कारचालकाने ओव्हरटेक कऱण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान, भरधाव वेगामुळे कारवरचं त्याचं नियंत्रण सुटलं आणि ही कार पिकअपवर आदळली. त्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रकमध्ये जाऊन घुसली. अपघाताचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या लोकांनी आणि तिथून जात असलेल्या वाहन चालकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच गंभीर जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघात एवढा भीषण होता की त्यात यापैकी काही महिलांचा आधीच मृत्यू झाला होता.

दरम्यान, अंत्यसंस्काराहून परतताना कुटुंबीयांनी कारचालकाला वाहन हळू चालवण्याबाबत बजावले होते. मात्र त्याने भरधाव वेगात कार चालवली आणि ही भीषण दुर्घटना घडली, अशी माहितीही समोर येत आहे.  

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानFamilyपरिवार