‘मेक इन इंडिया’बाबत राजन यांचा सावधगिरीचा इशारा

By Admin | Updated: December 12, 2014 23:59 IST2014-12-12T23:59:54+5:302014-12-12T23:59:54+5:30

भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्रातील नवीन सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाच्या यशस्वीतेबाबत साशंकता व्यक्त करीत सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे.

Rajan's guardianic alert about 'Make in India' | ‘मेक इन इंडिया’बाबत राजन यांचा सावधगिरीचा इशारा

‘मेक इन इंडिया’बाबत राजन यांचा सावधगिरीचा इशारा

नवी दिल्ली :  भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्रातील नवीन सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाच्या यशस्वीतेबाबत साशंकता व्यक्त करीत सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे. हे अभियान चीनच्या निर्यात केंद्रित आर्थिक वृद्धीने प्रेरित वाटते. ‘मेक इन इंडिया’ऐवजी ‘मेक फॉर इंडिया’ चा अंगीकार करायला हवा. जेणोकरून देशांतर्गत बाजारासाठी उत्पादन तयार करता येईल.
 भरत राम स्मृती परिसंवादात ‘मेक इन इंडिया, लाजर्ली फॉर इंडिया’ या विषयावर ते बोलत होते.
 पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्या पाश्र्वभूमीवर  रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर राजन यांनी व्यक्त केलेल्या उपरोक्त मतास महत्त्व प्राप्त होते. फक्त एका विशिष्ट क्षेत्रवर लक्ष केंद्रीत केले जाऊ नये. भारताची स्थिती चीनपेक्षा वेगळी असून भारत एका वेगळ्या कालखंडात विकसित होत आहे. तेव्हा या  अभियानाच्या यशस्वीतेबाबत  शंका घेतली पाहिजे. मेक इन इंडिया म्हणजे निव्वळ निर्यात केंद्रीत आर्थिक वृद्धीच्या मार्गाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न आहे.  चीनने हा मार्ग निवडला होता. यात जोखीम वाटते. परंतु, माङया मते एका विशिष्ट क्षेत्रवर लक्ष केंद्रीत करणो उचित नाही. भारताने कारखान्यातील उत्पादने निर्यात करण्याचे ठरविले तर चीनसोबत स्पर्धा करावी लागेल.
बचतीला प्रोत्साहन द्यावे
 गुंतवणुकीला चालना मिळावी म्हणून देशांतर्गत बचतीला प्रोत्साहन देण्यात यावे, असे आग्रही मतही  रघुरामन राजन यांनी व्यक्त केले. वैयक्तिक बचतीसाठी मिळणारा आयकराचा लाभ नाममात्र असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

Web Title: Rajan's guardianic alert about 'Make in India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.