शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:39 IST

Raja Raghuvanshi Murder Case: संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा छडा लावत मेघालय पोलिसांनी या प्रकरणी राजा याची पत्नी सोनम रघुवंशी, तिचा प्रियकर राज आणि इतर चार आरोपींना अटक केली होती. सुरुवातीपासून लव्ह ट्रँगलमधून ही हत्या घडल्याचे सांगण्यात येत आहे.

संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा छडा लावत मेघालय पोलिसांनी या प्रकरणी राजा याची पत्नी सोनम रघुवंशी, तिचा प्रियकर राज आणि इतर चार आरोपींना अटक केली होती. सुरुवातीपासून लव्ह ट्रँगलमधून ही हत्या घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी आता यावर पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे. लग्नानंतर काही दिवसांमध्येच सोनम हिच्या मनात पती राजाबद्दल एवढं शत्रूत्व निर्माण झालं असावं याबाबत पोलिसांच्या मनात शंका आहे. राज्याचे डीजीपी इधाशिशा नोग्रांग यांनी याबाबतची माहिती देत या प्रकरणाला नवं वळण दिलं आहे. त्यामुळे आता राजा सूर्यवंशी हत्या प्रकरणाचा तपास हा केवळ लव्ह ट्रँगलपुरता मर्यादित राहणार नाही. तर त्यामध्ये इतर मुद्द्यांचाही विचार होणार आहे.  

याबाबत डीजीपी नोंग्रांग यांनी सांगितले की, लग्नानंतर लगेचच सोनम हिच्या मनात पती राजा याच्याबाबत टोकाचा राग निर्माण होण आम्हाला थोडं विचित्रच वाटतंय. त्यामुळे आम्ही प्रेम प्रकरणासह इतर सर्व संभाव्य कारणांचाही विचार करत आहोत. या प्रकरणी पोलिसांकडे आतापर्यंत सबळ पुरावे आहेत. मात्र अजून काही गोष्टी स्पष्ट होणे बाकी आहे, असेही नोग्रांग यांनी सांगितले.

मेघालय पोलिसांकडून खालील मुद्द्यांवर तपास केंद्रित करण्यात आला आहे.-सोनम आणि राज यांच्या मागे आणखी कुणी व्यक्ती आहे का?- हत्या करण्याचा हेतू मालमत्ता, विमा आणि कुठला अन्य लाभ हे कारण आहे का?- सोनमलासुद्धा अन्य कुणी व्यक्ती ब्लॅकमेल करत होती का? - ही हत्या क्राईम ऑफ पॅशन नव्हे तर क्राईम ऑफ पर्सनल पॉलिटिक्स होती का?

मध्य प्रदेशमधील इंदूर येथील रहिवासी असलेल्या राजा रघुवंशी आणि सोनम यांचा विवाह ११ मे रोजी झाला होता. त्यानंतर २१ मे रोजी हे दोघेही हनिमूनसाठी मेघालयमध्ये गेले होते. २३ मे रोजी सोहरा येथील नोंग्रियात गावातील एका होमस्टेमधून चेक आऊट केल्यानंतर राजा रघुवंशा आणि सोनम हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यावर हत्येला दहा दिवस उलटल्यानंतर राजा याचा मृतदेह दरीत सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास केल्यावर या हत्येमागे पत्नी सोनम, तिचा प्रियकर राज आणि त्याच्या काही मित्रांचा हात असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी सोनम रघुवंशी, तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि त्याच्या तीन मित्रांना अटक केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस