शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

पैशांसाठी नाही तर 'या' कारणासाठी आरोपींनी केली राजा रघुवंशीची हत्या; सोनमसमोरच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 17:45 IST

राजा रघुवंशीची हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.

Raja Raghuvanshi Case: मेघालयात हत्या झालेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. मेघालयातील शिलाँग येथे हनिमूनदरम्यान पती राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघवुंशीने हत्या केली होती. हनिमूनच्या बहाण्याने राजा रघुवंशीला मेघालय येथे नेऊन सोनमने प्रियकरासह मिळून त्याला संपवले होते. त्यानंतर सोनम बेपत्ता झाली होती. १७ दिवसांनी उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावर तिने आत्मसमर्पण केले. मेघालय पोलिसांनी याप्रकरणात सोनमसह चार अटक केली. आता राजाची हत्या करणाऱ्या आरोपींनी पैशांसाठी हे कृत्य केलं नसल्याचे समोर आलं आहे.

सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांच्यासह राजाची हत्या करणारे तिघे सध्या मेघालय पोलिसांच्या ८ दिवसांच्या कोठडीत आहेत. यादरम्यान, सोनम आणि राज यांनी पोलीस चौकशीत राजाची हत्या करण्याचा कट रचल्याचे कबूल केले आहे. त्याचबरोबर, सोनमशी लग्न करण्याच्या ११ दिवस आधी राजाला संपवण्याची तयारी करण्यात आली होती. आरोपी विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी या तीन मुलांनी सोनमच्या सांगण्यावरूनच राजाची हत्या केली होती. पण आता यावर एक नवीन खुलासा झाला आहे.

सोनम आणि राज यांनी राजाला मारण्यासाठी तीन लोकांना कामावर ठेवले होते. राजाला संपवण्यासाठी या तिघांना सुपारी देण्यात आली होती. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा दावा  फेटाळून लावला आहे. तिन्ही आरोपी राज कुशवाहाचे ओळखीचे आहेत. त्यापैकी एक राजचा चुलत भाऊ देखील आहे. तिघांनीही राजशी असलेल्या दीर्घकाळच्या मैत्रीमुळे राजाची हत्या केली आणि सोनमला मदत केली. सोनमने इशारा केल्यानंतर विशालने आधी राजावर हल्ला केला, त्यानंतर इतर दोन मुलांनीही हल्ला करून त्याला ठार मारले. हे सर्व सोनमच्या डोळ्यासमोर घडले. यानंतर सोनमने तिन्ही मुलांसह राजाचा मृतदेह खड्ड्यात फेकण्यास मदत केली.

सोनम आणि राजा २३ मे रोजी इंदौरहून हनिमूनसाठी शिलाँग येथे गेल्यानंतर बेपत्ता झाले होते. मेघालय पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी शोध मोहीमही राबवली. त्यानंतर २ जून रोजी पोलिसांना राजाचा मृतदेह एका खड्ड्यात सापडला. मृतदेह खूपच वाईट अवस्थेत होता. मात्र पोलिसांना सोनम तिथे सापडली नाही. पोलिसांना राजाच्या हत्येत वापरलेला चाकू, त्याची स्कूटी आणि रेनकोटही सापडला. त्यानंतर पोलिसांनी सोनमशी संबंधित सर्व माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. सोनमच्या कॉल डिटेल्सवरून पोलिसांना कळले की सोनम राज कुशवाह नावाच्या व्यक्तीच्या सतत संपर्कात होती. त्यानंतर पोलिसांचा तपास पुढे गेला आणि ८ जूनच्या रात्री राज कुशवाहाला अटक करण्यात आली.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस