राजा, कनिमोझी यांचा जामीन अर्ज दाखल

By Admin | Updated: May 27, 2014 05:55 IST2014-05-27T05:55:22+5:302014-05-27T05:55:22+5:30

माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोझी व अन्य सात आरोपींनी दिल्लीच्या एका न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.

Raja, Kanimozhi files bail | राजा, कनिमोझी यांचा जामीन अर्ज दाखल

राजा, कनिमोझी यांचा जामीन अर्ज दाखल

नवी दिल्ली : माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोझी व अन्य सात आरोपींनी दिल्लीच्या एका न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. सक्तवसुली संचालनालयाने २-जी घोटाळ्याशी संबंधित काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपी सोमवारी न्यायालयात हजर झाले. त्यांच्याविरुद्ध समन्स काढण्यात आला होता. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या अर्जावर २८ मे रोजी सुनावणी केली जाणार आहे. या प्रकरणात द्रमुकप्रमुख एम. करुणानिधी यांची पत्नी दयालू अम्माल देखील आरोपी आहेत. त्या न्यायालयात हजर झाल्या नाहीत. मानसिक स्थिती चांगली नसल्याने वैयक्तिकरीत्या हजर राहण्यापासून सूट मिळावी म्हणून त्यांच्या वकिलाने न्यायालयात याचिका केली. न्यायालयाने अम्माल यांची याचिका मान्य केली. सर्व आरोपींना प्रकरणाशी संबंधित सर्व दस्तऐवज देण्याचे निर्देश विशेष सीबीआय न्यायाधीश ओ.पी.सैनी यांनी ईडीला दिले. दस्तऐवज पुष्कळ असल्याने त्यांचा अभ्यास करण्यासाठी किमान दोन दिवस देण्याची मागणी आरोपींनी केली. त्यानंतर न्यायालयाने दस्तऐवजांचे निरीक्षक करण्यासाठी आणि जामीन अर्जावर विचार करण्यासाठी २८ मे तारीख निश्चित केली. (लोकमत न्यूज नेटवर्क) राजा, कनिमोझी यांच्यासह स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहीद उस्मान बालवा आणि विनोद गोयंका, कुसेगाव फ्रुटस् अँड व्हेजिटेबल्स प्रा.लि.चे संचालक आसीफ बालवा आणि राजीव अग्रवाल, चित्रपट निर्माता करीम मोरानी, कलेगनर टी.व्ही.चे व्यवस्थापकीय संचालक शरदकुमार आणि पी. अमीरथम हे न्यायालयात हजर होते. या सर्वांनी जामिनासाठी अर्ज केला. २-जी घोटाळ्याशी संबंधित काळा पैसा पांढरा केल्या प्रकरणात स्वॉन टेलिकॉम प्रवर्तकांनी द्रमुक चालवीत असलेल्या कलेगनर टीव्हीला २०० कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे.

Web Title: Raja, Kanimozhi files bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.