राज ठाकरे होतील ‘मायावती’- आठवले

By Admin | Updated: September 14, 2014 01:53 IST2014-09-14T01:53:03+5:302014-09-14T01:53:03+5:30

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष ‘मायावती’च्या रांगेत जाऊन बसेल. एक जागा जरी मिळवली तरी मनसेने खूप कमावले असे समजू, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला.

Raj Thackeray will be 'Mayawati' - Athavale | राज ठाकरे होतील ‘मायावती’- आठवले

राज ठाकरे होतील ‘मायावती’- आठवले

नवी दिल्ली : मोदींची ‘कॉपी’ करणो ये:या गबाळ्याचे काम नव्हे. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष ‘मायावती’च्या रांगेत जाऊन बसेल. एक जागा जरी मिळवली तरी मनसेने खूप कमावले असे समजू, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी लगावला. हरियाणात काही जागा रिपाइं लढणार आहे. तेथील कार्यकत्र्याच्या बैठकीनंतर ‘लोकमत’शी बोलताना  ते म्हणाले, राज ठाकरे यांची हवा गुल झाली आहे. स्वत:च लढण्याची घोषणा करायची अन् नंतर स्वत:च माघार घ्यायची. त्यांचे काय सुरू आहे, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. 26 मे 2क्12 रोजी आपण स्वत:च त्यांना शिवसेनेसोबत या, असे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनीही ‘टाळी’ वाजवण्याची तयारी दाखविली होती. ते आले असते, तर त्यांचा सन्मान राहिला असता. पण त्यांना एकटय़ाने लढण्याची भारी खुमखुमी आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाची स्थिती त्यांना कळली. पक्ष चालवायला कार्यकर्ते लागतात, ते त्यांच्याकडे नाहीत. त्यांची हवा उरली नाही. विधानसभेत खरं काय ते कळेल. लोकसभेत ज्याप्रमाणो मायावतींच्या पक्षाने एकही जागा मिळवली नाही, तसेच राज यांचे विधानसभेत झाल्यास नवल वाटू नये, असे आठवले म्हणाले. (विशेष प्रतिनिधी) 
 
उदित नारायण येणार
आपल्या पक्षाचे इनकमिंग सुरू आहे. काही सिनेस्टार्स येत आहेत. आता गायक उदित नारायण प्रवेश घेणार असल्याचे ते म्हणाले. 

 

Web Title: Raj Thackeray will be 'Mayawati' - Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.