बिटकॉइन घोटाळ्यात ईडीनं राज कुंद्रा यांना पाठवलं समन्स, चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 15:25 IST2018-06-05T15:25:47+5:302018-06-05T15:25:47+5:30
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला ईडी(अंमलबजावणी संचलनालया)नं बिटकॉइन प्रकरणात समन्स पाठवलं आहे.

बिटकॉइन घोटाळ्यात ईडीनं राज कुंद्रा यांना पाठवलं समन्स, चौकशी सुरू
नवी दिल्ली- अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला ईडी(अंमलबजावणी संचलनालया)नं बिटकॉइन प्रकरणात समन्स पाठवलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज कुंद्रांची मुंबईतच्या ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणातला मुख्य आरोपी अमित भारद्वाजला पुण्यातून अटक करण्यात आली होती.
अमित भारद्वाज याची चौकशी केली असता त्यानं राज कुंद्राचं नाव सांगितलं आहे. अनेक सेलिब्रिटी बिटकॉइनच्या माध्यमातून पैसे कमवत असल्याचंही ईडीच्या चौकशीत उघड झालं आहे. अमित भारद्वाज हा अनेक अभिनेत्यांचे पैसे बिटकॉइनमध्ये लावत होता. विशेष म्हणजे या घोटाळ्याची माहिती दोन हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याची चर्चा आहे. अमितनं gatbitcoin.com नावाच्या वेबसाइटच्या माध्यमातून लोकांना गंडा घातला होता. यावेळी ईडीच्या रडारवर अनेक बॉलिवूडमधले अभिनेते आणि अभिनेत्री आहेत.
अमित भारद्वार आणि त्याच्याशी संबंधित बिटकॉइन पाँजी स्कीमचं आमिष दाखवून जवळपास 50 ते 60 लोकांना गंडा घातला आहे. सर्व तक्रारीनंवर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं अमितविरोधात खटला भरला आहे. अमित भारद्वारविरोधात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमध्ये बिटकॉइनशी संबंधित दोन प्रकरणे आहेत. पोलीस अमित भारद्वारकडे आणखी चौकशी करत आहेत.