राज बब्बर यांची उत्तरप्रदेशच्या कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड
By Admin | Updated: July 12, 2016 19:30 IST2016-07-12T19:30:55+5:302016-07-12T19:30:55+5:30
उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज बब्बर यांची उत्तरप्रदेशच्या कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

राज बब्बर यांची उत्तरप्रदेशच्या कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज बब्बर यांची उत्तरप्रदेशच्या कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशच्या कॉंग्रेस अध्यक्षपदी राज बब्बर यांची नियुक्ती केल्याची घोषणा कॉंग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी मंगळवारी केली. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
उत्तरप्रदेशातील प्रचार सभांना सुरुवात केल्यानंतर आम्ही लवकरच मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार जाहीर करु, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. तसेच, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांच्या सहभागाबाबत कोणीही काही बोलले नाही.
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. त्यासाठी आत्तापासून सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे.