UP Election 2022 : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जब्बर झटका; राज बब्बर यांची होणार 'घरवापसी'?, पोस्टनंतर चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:58 PM2022-01-27T15:58:39+5:302022-01-27T15:59:40+5:30

राज बब्बर यांनी आपला राजकीय प्रवास जनता दलाकडून सुरू केला होता. परंतु नंतर त्यांनी सपामध्ये प्रवेश केला आणि २००६ मध्ये त्यांनी काँग्रेसचा हात धरला होता. 

raj babbar congress leader actor may join samajwadi party akhilesh yadav up election 2022 congress priyanka gandhi | UP Election 2022 : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जब्बर झटका; राज बब्बर यांची होणार 'घरवापसी'?, पोस्टनंतर चर्चांना उधाण

UP Election 2022 : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जब्बर झटका; राज बब्बर यांची होणार 'घरवापसी'?, पोस्टनंतर चर्चांना उधाण

Next

येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका (Uttar Pradesh Assembly Election 2022) पार पडणार आहे. परंतु या निवडणुकीत काँग्रेसला एकावर एक धक्के बसत असल्याचं दिसून येतंय. काँग्रेस नेत्यांची काँग्रेसचा हात सोडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. यूपीए सरकारमध्ये (UPA Government) मंत्री राहिलेले आरपीएन सिंह भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर माजी खासदार राकेश सचान यांनीही काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर (Raj Babbar) यांच्या घरवापसीच्या चर्चाही जोर धरू लागल्या आहेत. सपाच्या प्रवक्त्यानं तसे संकेतही दिले आहेत.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी समाजवादी नेते, अभिनेता लवकरच समजवादी होतील, अशी पोस्ट सपाचे प्रवक्ते फखरुल हसन चांद यांनी कू वरून केली आहे. त्यांची ही पोस्ट आणि संकेत राज बब्बर यांच्याकडे लक्ष वेधणारे आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर राज बब्बर यांची सपात सामील होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज बब्बर हे थोडे दूर गेल्याचं दिसलं होतं.


प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसची कमान हाती घेतल्यापासून राज बब्बर सक्रिय नाहीत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरच राज बब्बर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसले नाहीत. काँग्रेसच्या G-२३ नेत्यांमध्ये राज बब्बर यांचंही नाव आहे.

असा होता प्रवास
चित्रपट अभिनेते आणि नंतर राजकारणी बनलेल्या राज बब्बर यांनी जनता दलातून आपला प्रवास सुरू केला. ५ वर्षे जनता दलात राहिल्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. १९९४ मध्ये सपाने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि २००४ मध्ये ते सपाच्या तिकिटावर जिंकून पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले. २००६ मध्ये, अमर सिंह यांचा सपामध्ये राजकीय प्रभाव वाढल्यानंतर, त्यांनी सपापासून फारकत घेतली आणि माजी पंतप्रधान व्हीपी सिंह यांच्यासोबत जन मोर्चाची स्थापना केली.

राज बब्बर यांनी २००८ मध्ये सपा सोडल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सपा प्रमुख अखिलेश यादव २००९ मध्ये कन्नौज आणि फिरोजाबाद मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले, त्यानंतर त्यांनी फिरोजाबादची जागा सोडली. २००९ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव सपाच्या तिकिटावर उतरल्या आणि काँग्रेसने त्यांच्या विरोधात राज बब्बर यांना उभं केलं होतं. त्यावेळी राज बब्बर यांनी डिंपल यादव यांचा पराभव करत सपाला झटका दिला. २०१४ मध्ये काँग्रेसनं त्यांना गाझियाबादमधून जनरल व्ही.के.सिंग यांच्याविरोधात निवडणुकीला उतरवलं. परंतु त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना उत्तराखंडमधून राज्यसभेवर पाठवलं.

Web Title: raj babbar congress leader actor may join samajwadi party akhilesh yadav up election 2022 congress priyanka gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.