शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांचा अजब कारभार; कॉलम-स्लॅब उभारले, टाकीच बसवली नाही, ग्रामस्थ पाण्यासाठी व्याकुळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:36 IST

या कामात भ्रष्टाचार झाल्याचा दावा स्थानिक करत आहेत.

सरकारी कामांमध्ये अनेकदा निष्काळजीपणा आणि गंभीर चुका झाल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. आता अशाच प्रकारची एक घटना छत्तीसगडच्या रायपूरमधून समोर आली आहे. येथे 'जल जीवन मिशन' योजनेतील गैरव्यवहार उघडकीस आला आहे. अधिकाऱ्यांनी दुर्ग जिल्ह्यातील रुडा ग्रामपंचायतीत सुमारे एक कोटी खर्चून पाण्याची टाकी उभारली, मात्र त्यावर टाकी बसवलीच नाही. 

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी उंच पाण्याची टाकी उभारण्यासाठी पीलर आणि कॉलम उभारले, त्यावर स्लॅब टाकला, वर चढण्यासाठी लोखंडी शिडीही बसवली. मात्र, त्यावर पाण्याची टाकी बसवलीच नाही. इतर गोष्टींसाठी इतका पैसा खर्च केला की, टाकीसाठी पैसे शिल्लक राहिले नाही. ग्रामस्थांनी याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता, वेगळी टाकी बसवली जाईल, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी छत्तीसगडमध्ये आजपर्यंत अशी टाकी कधीही बांधली गेली नाही. आरसीसी टाकीची संपूर्ण रचना आरसीसीची असते. सिंथेटिक्स किंवा इतर प्रकारच्या टाकी असलेल्या ओव्हरहेड टाकीची संपूर्ण रचना स्टीलची असते. जेव्हा संपूर्ण रचना आरसीसीची असते, तेव्हा झिंक अॅल्युमिनियमने फक्त उभ्या भिंती बनवण्याच्या खर्चात फारसा फरक पडणार नाही. शिवाय, आरसीसी टाकीचे आयुष्य ५० ते ७० वर्षे असते, तर झिंक अॅल्युमिनियमचे आयुष्य १५ ते २० वर्षे असते. त्यामुळे खर्च कमी करण्याचा त्या अधिकाऱ्यांचा युक्तिवाद चुकीचा आहे. यावरुन या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड होते.

ऑक्टोबर २०२२ मध्ये काम पूर्ण झाल्याचा दावाजल जीवन मिशनच्या गट नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत, २०२१ मध्ये दुर्गच्या १३ गावांमध्ये पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी स्वतंत्र कामाचे आदेश देण्यात आले होते. या अपूर्ण टाकीबाबत गावचे सरपंच नंदकुमार साहू यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी या योजनेत मोठा गैरव्यवहार केला आहे. मे ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान कामाचे आदेश देण्यात आले होते. तर, ऑक्टोबर २०२२ च्या सर्वसाधारण सभेत काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. म्हणजेच टाकी बांधल्याशिवाय पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडWaterपाणीGovernmentसरकारJara hatkeजरा हटकेCorruptionभ्रष्टाचार