नेपाळमधील पावसाने यूपीत पूर
By Admin | Updated: August 25, 2014 04:24 IST2014-08-25T04:24:22+5:302014-08-25T04:24:22+5:30
शेजारच्या नेपाळमध्ये झालेली ढगफुटी आणि कोसळत असलेला मुसळधार पाऊस यामुळेच उत्तर प्रदेशच्या भडोच आणि खेरी जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसला आहे

नेपाळमधील पावसाने यूपीत पूर
लखीमपूर : शेजारच्या नेपाळमध्ये झालेली ढगफुटी आणि कोसळत असलेला मुसळधार पाऊस यामुळेच उत्तर प्रदेशच्या भडोच आणि खेरी जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसला आहे, असे राज्याचे पाटबंधारे मंत्री शिवपाल यादव यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमधील पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेपाळमधून येणाऱ्या पाण्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. महापूर हा राष्ट्रीय मुद्दा आहे आणि या संदर्भात राज्य सरकारने केंद्राला पत्रही लिहिले आहे, असे यादव यांनी सांगितले. केंद्र सरकार पुरेसे सहकार्य करीत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, केंद्राच्या पथकाने गेल्या वर्षी राज्याच्या पूरग्रस्त भागांचा दौरा केला. पण अद्याप मदत मिळालेली नाही. आम्ही नव्याने पाहणी करू आणि केंद्राकडे मदत मागू. (वृत्तसंस्था)