कोकण, विदर्भात पाऊस

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:10+5:302015-08-18T21:37:10+5:30

Rainfall in Konkan, Vidarbha | कोकण, विदर्भात पाऊस

कोकण, विदर्भात पाऊस

>कोकण, मराठवाड्यात पाऊस

पुणे : कोकण गोवा व मराठवाड्यात बर्‍याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या २४ तासात पाऊस पडला़ कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुढील ५ दिवसात राज्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़
गेल्या २४ तासात विदर्भात महागाव ४० मिमी, ठाणे, अंबेजोगाई, हदगाव, कळंब, केज, परभणी, रेणापूर, सेलू येथे प्रत्येकी ३०, भिवंडी, माणगाव, माथेरान, रोहा, उरण, बसमत, भूम, कळमनुरी, कंधार, मांजलगाव, निलंगा, धानोरा, उमरखेड येथे प्रत्येकी २०, अलिबाग, भिरा, हर्णे, चिपळूण, कर्जत, खालापूर, खेड, महाड, मुंबई, शहापूर, बीड, धालेगाव, गंगाखेड, धनसावंगी, हिंगोली, माहूर, पालम, परतूर, पाटोदा, उमरी, भामरागड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, मुलचेरा, नरखेड येथे पाऊस झाला़
पुणे व परिसरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे़
राज्यात आज दिवसभरात ब्रम्हपूरी १४, चंद्रपूर १३, गोंदिया ८, भिरा ३ आणि मुंबई ०़२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़

Web Title: Rainfall in Konkan, Vidarbha