शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Rain Update: दिल्ली बुडाली, आता या राज्यांमध्ये येऊ शकतो पूर, अतिवृष्टीबाबत हवमान खात्याचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 11:11 IST

Rain Update: देशातील सुमारे २० राज्यांसाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील काही भागांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे राजधानी दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता देशातील सुमारे २० राज्यांसाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील काही भागांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशमधील ५० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पाभस पडण्याची शक्यता आहे. पावसाचा धोका लक्षात घेऊन एसडीआरएफची टीम तैनात करण्यात येत आहे. तर उत्तराखंडमध्ये टिहरी, देहराडून, पौडी, हरिद्वार, चम्पावत, नैनीताल आणि उधमसिंह नगर येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासाठीही अलर्ट जारी करून हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.

दिल्लीमध्ये यमुना नदीला आलेल्या पुरानंतर आता दिल्लीमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागात १६ ते १९ जुलैपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या चार दिवसांमध्ये कमाल तापमान हे ३१ ते ३२ डिग्री आणि किमान तापमान हे २६ ते २७ डिग्री एवढे राहू शकते. तर २० जुलैपासून पावसाचं प्रमाण कमी होईल. दिल्लीमध्ये १५ जुलैपर्यंत ३०८ मिमी पाऊस पडला आहे. तो सरासरी पावसापेक्षा १०५ मिमी अधिक आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या अलर्टने दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढच्या तीन दिवसांमध्ये जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ा या दरम्यान, ४५ ते ५५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात.  

टॅग्स :RainपाऊसMonsoon forecastमोसमी पावसाचा अंदाजmonsoonमोसमी पाऊसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र