पाऊस.... एक
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:51+5:302015-02-11T23:19:51+5:30
नांद

पाऊस.... एक
न ंदपरिसरात बुधवारी पहाटे ४.३० वाजता प्रचंड विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. खरीप हंगाम बुडालेल्या शेतकऱ्यांची अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे पुन्हा झोप उडाली आहे.परिसरात शेतामध्ये गहू, हरभरा, तूर, हळद, लाख आदी पिके आहेत. परंतु या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गव्हाचे पीक परिपक्व होऊन कापणीच्या अवस्थेत होते. मात्र, या अवकाळी पावसामुळे गहू पीक लोटल्या गेले. येथील शेतकरी पांडुरंग तिमांडे, श्यामराव खानोरकर, प्रभाकर दांडेकर यांच्या शेतीतील गहू, तूर या पिकांची प्रचंड नासाडी झाली. या वादळी पावसामुळे परिसरातील ४०० ते ५०० क्विंटल गव्हाचे व इतर मालाचे नुकसान होणार असल्याचा अंदाज काहींनी वर्तविला आहे. कृषी व महसूल विभागाने परिसरातील पिकांच्या नुकसानीबाबत सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी व्यक्त होत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी व इतर पिके वाया गेली. त्यामुळे शेतकरी हतबल होता. त्यातच पुन्हा या वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.खातमौदा तालुक्यातील खात परिसरात बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास प्रचंड मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसल्याने गहू, हरभरा या रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. गव्हाच्या लोंब्या परिपक्व होत असतानाच पीक जमिनीवर लोटले. हरभऱ्याचीही हीच अवस्था झाली. याचा उत्पादन व गुणवत्तेवर विपरित परिणाम होणार असून शेतकऱ्यांना खरीपाप्रमाणेच रबीतही मोठी आर्थिक झळ बसणार आहे. या अवकाळी पावसामुळे भातगिरण्यांच्या आवारात ठेवलेली हजारो धानाची पोती ओली झाली. वीटभट्ट्यांचेही प्रचंड नुकसान झाले. नागरिक पहाटेच्या साखरझोपेत असल्याने ते घराबाहेर असलेल्या वस्तंूचा पावसापासून बचाव करू शकले नाही. तोंडली येथे राजू शेंडे यांच्या शेतात वीज वाहक तारा तुटल्या. त्यामुळे काही काळ वीज पुरवठा बंद होता. अरोली वीज वितरण उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता मुत्तेपवार यांनी कर्मचाऱ्यांसह पहाटेपासून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी परिश्रम घेतले. शासनाने या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.