पावसाचा कहर; 24 बळी

By Admin | Updated: August 17, 2014 01:50 IST2014-08-17T01:50:51+5:302014-08-17T01:50:51+5:30

गतवर्षी महाप्रलयाचा तडाखा बसलेल्या उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी आणि भूस्खलनाने संकट निर्माण केले आह़े

Rain havoc; 24 victims | पावसाचा कहर; 24 बळी

पावसाचा कहर; 24 बळी

>उत्तराखंडला पुन्हा फटका : ढगफुटी, भूस्खलनाचे संकट, पर्यटक अडकले
डेहराडून : गतवर्षी महाप्रलयाचा तडाखा बसलेल्या उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी आणि भूस्खलनाने संकट निर्माण केले आह़े आज शनिवारी येथील काठबंगला भागात भूस्खलनात तीन घरे गाडले गेल्याने सात जण मृत्युमुखी पडल़े याचसोबत गत 24 तासांत राज्यातील पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 24 वर पोहोचली़
उत्तराखंडच्या अनेक भागांत काल शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस आह़े आज पहाटे डेहराडूनच्या काठबंगला भागात भूस्खलनामुळे तीन घरे मलब्याखाली गाडल्या गेली़ यात सात जणांचा मृत्यू झाला़ यात एका महिलेचा समावेश आह़े अन्य एका महिलेला मलब्याखालून बाहेर काढण्यात यश आले आह़े डेहराडून आणि मसुरीदरम्यान तीन ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे मोठय़ा प्रमाणात पर्यटक अडकून पडले आह़े पश्चिम बंगालमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलपायगुडी आणि अलीपूरद्वार हे जिल्हे प्रभावित झाले आहेत़ 
 
राप्तीला पूर
च्नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिलत राप्ती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा जारी केला आह़े  
 
राष्ट्रपती, पंतप्रधानांना दु:ख
च्राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडातील पाऊस आणि भूस्खलनातील जीवित हानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आह़े 
 
आसाम, बिहारात पूरस्थिती बिकट
नवी दिल्ली : आसाम, बिहारात पूरस्थिती भीषण असून अनेक भागांत पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोक प्रभावित झाले आहेत़ उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिलत राप्ती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा जारी केला आह़े मेघालयातही दोन दिवसांच्या संततधार पावसानंतर अलर्ट जारी करण्यात आला आह़े
 आसामात ब्रrापुत्र आणि तिच्या उपनद्या दुथडी भरून वाहत असल्याने पूरस्थिती बिकट झाली आह़े आज शनिवारी लखीमपूर जिलत पुरात वाहून गेलेल्या एका बालकाचा मृतदेह आढळून आला़ सहा जिलंत दोन लाखांवर लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत़ 
एकशिंगी गेंडय़ांचे भारतातील एकमेव आश्रयस्थान असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा अर्धा भागही पुराखाली गेला आह़े पुराचे पाणी शिरल्याने अनेक प्राण्यांनी उंच भागात स्थलांतर चालवले आह़े 
बिहारात दरभंगा, पश्चिम चंपारण्य आणि नालंदा जिलतील हजारो लोक पुरामुळे प्रभावित 
झाले आहेत़ सर्व नद्या दुथडी 
भरून वाहत असल्यामुळे अनेक गावे जलमय झाली आहेत़  प़ चंपारण्य जिलत 7क् गावांत पुराचे पाणी शिरले आह़े पौडी, टिहरी, रुद्रप्रयाग, पिथौरागड जिलत भूस्खलनाच्या बहुतांश घटना घडल्या़ यात 17 लोक ठार झाल़े बद्रीनाथ आणि गंगोत्री मार्ग भूस्खलनामुळे बंद करण्यात आला.

Web Title: Rain havoc; 24 victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.