शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

उत्तराखंडमध्ये अचानक पूर, कडे कोसळल्यामुळे हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 2:18 AM

येत्या २-३ दिवसांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली : उत्तराखंडाला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी अचानक पूर आला आहे. अनेक ठिकाणी कडे कोसळले आहेत. राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आगामी २ ते ३ दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.राज्य आपत्ती निवारण केंद्रानेही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय जल आयोगाने टिष्ट्वटरवर जारी केलेल्या अधिकृत पूर अंदाजात म्हटले आहे की, उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्यप्रदेश या भूप्रदेशात अचानक पूर येऊ शकतो, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.सूत्रांनी सांगितले की, मुसळधार पाऊस आणि कोसळलेले कडे यामुळे गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. हा महामार्ग जवळपास ३0 तासांपासून बंद आहे. महामार्ग बंद झाल्यामुळे आमचे जगणे दुस्तर झाल्याचे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. चीन सीमेला लागून असलेल्या भागांचा संपर्क तुटला आहे.हेनवल नदीच्या काठावरील लोकांना हलविलेगंगा नदी धोक्याच्या पातळीच्या १0 सें.मी.वर वाहत आहे. गंगेची उपनदी असलेल्या हेनवल नदीने पात्र सोडल्यामुळे काठावरील गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे मुनी की रेती पोलीस ठाण्याचे एसएचओ किशोर सकलानी यांनी सांगितले.चंपावत जिल्ह्यातील शारदा बॅरेजची पाणीपातळी वाढत आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे उत्तर प्रदेशातील १0 जिल्ह्यांना धोका संभवतो.२ ते ३ दिवसांत पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :floodपूर