विदर्भासह राज्यात पाऊस ओसरला

By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:31+5:302015-08-31T00:24:31+5:30

पुणे : मागील दोन दिवस विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी सुरू झालेला पाऊस पुन्हा ओसरला आहे. रविवारी दिवसभरात कोकणात अनेक भागात तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

Rain accompanied by Vidarbha rain in the state | विदर्भासह राज्यात पाऊस ओसरला

विदर्भासह राज्यात पाऊस ओसरला

णे : मागील दोन दिवस विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी सुरू झालेला पाऊस पुन्हा ओसरला आहे. रविवारी दिवसभरात कोकणात अनेक भागात तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
कमी दाबाचा प˜ा ओसरल्याने पावसाचे प्रमाण घटले आहे. मागील दोन दिवस कोकण व विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही अनेक भागात पाऊस पडल्याने काहीसा दिलासा मिळाला. कमी दाबाच्या प˜यामुळे आणखी काही दिवस पावसाचे सातत्य राहील, अशी अपेक्षा होती. पण रविवारपासून जोर ओसरू लागला आहे. रविवारी दिवसभरात कोकणात अनेक भागात पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात पुण्यासह कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक व अन्य काही भागात पाऊस पडला. विदर्भात चंद्रपुर व नागपुरमध्ये तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याची नोंद भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे झाली आहे.
रविवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या चोवीस तासात कोकण व विदर्भात अनेक ठिकाणी पडला. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाने तुरळक ठिकाणी हजेरी लावली. दरम्यान, पुढील चार दिवस कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
----------
राज्यातील काही प्रमुख शहरांतील पाऊस (मिलीमीटरमध्ये) -
कोल्हापुर ०.१, महाबळेश्वर १०, नाशिक ०.२, मुंबई १३, अलीबाग ५, रत्नागिरी ४, डहाणू ४, चंद्रपूर ६, नागपूर ०.१.
------------

Web Title: Rain accompanied by Vidarbha rain in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.