वित्त मंत्रालयातर्फे रेल्वेला मिळणार ४० हजार कोटी

By Admin | Updated: February 27, 2015 02:25 IST2015-02-27T02:25:52+5:302015-02-27T02:25:52+5:30

रेल्वेच्या वार्षिक नियोजनाअंतर्गत साकारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी वित्त मंत्रालयातर्फे सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे वित्त साहाय्य देण्यात येणार

Railways will get Rs 40,000 crore from the Finance Ministry | वित्त मंत्रालयातर्फे रेल्वेला मिळणार ४० हजार कोटी

वित्त मंत्रालयातर्फे रेल्वेला मिळणार ४० हजार कोटी

नवी दिल्ली : रेल्वेच्या वार्षिक नियोजनाअंतर्गत साकारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी वित्त मंत्रालयातर्फे सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे वित्त साहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्प मांडतेवेळी केली.
रस्ते बांधणीसाठी डिझेलच्या विक्रीवर जो उपकर लागू करण्यात आला आहे, त्याद्वारे रेल्वे मंत्रालयाचा वाटा सुमारे १६४५ कोटी रुपये असून, तो यापूर्वीच हस्तांतरित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बाजारातून सुमारे १७ हजार ६५५ कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. १७,७९३ कोटी रुपयांचा निधी अंतर्गत स्रोतांंद्वारे उभारण्यात येईल तर ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’च्या (पीपीपी) माध्यमातून ५,७८१ कोटींचा निधी रेल्वे मंत्रालयाला पुरविण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Railways will get Rs 40,000 crore from the Finance Ministry