India First Bullet Train Date Released:मुंबई-अहमदाबादबुलेट ट्रेन प्रकल्पाने प्रदूषणाच्या नियमांचे पालन न केल्याने आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्याने मुंबई पालिकेच्या एच पूर्व विभागाकडून प्रकल्पाला काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामास तूर्तास मोठा फटका बसणार आहे. यातच आता भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
बुलेट ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबाद हे अंतर केवळ २ तास ७ मिनिटांत कापता येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दर ३० मिनिटांनी ट्रेन पकडता येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसी आणि शिळफाटादरम्यानच्या २१ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे. या बोगद्यापैकी ५ किमी लांबीचा बोगदा शिळफाटा आणि घणसोलीदरम्यान न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (एनएटीएम) वापरून बांधला जात आहे, तर उर्वरित १६ किमी लांबीचा बोगदा टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) वापरून बांधला जात आहे. या बोगद्यात ठाणे खाडीखालील ७ किमी लांबीच्या भागाचाही समावेश आहे. १५ ऑगस्ट रोजी बुलेट ट्रेन सुरू होणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! मोठी माहिती समोर
बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरत ते बिलिमोरा असणार आहे. त्यानंतर वापी ते सुरत हा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावर वापी ते अहमदाबाद मार्ग सुरू होईल. हे सगळे मार्ग प्रवासी सेवेत आल्यावर ठाणे ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावेल. तर, सगळ्यात शेवटी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होईल. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट २०२७ रोजी प्रवाशांच्या सेवेत येईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई–अहमदाबादमधील व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाला चालना मिळणार आहे.
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
दरम्यान, या प्रकल्पात जपानचे शिंकान्सेन (Shinkansen) हाय-स्पीड ट्रेन तंत्रज्ञान वापरले जात आहे. या मार्गावर एकूण १२ स्टेशन्स असून, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई बुलेट ट्रेन स्टेशन हे मुंबई-अहमदाबाद एचएसआर कॉरिडॉरवरील एकमेव भूमिगत स्टेशन आहे. यासाठी जमिनीखाली ३२.५० मीटर (अंदाजे १०६ फूट) खोलीपर्यंत खोदकाम केले जा असून, या स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअरसह तीन मजले असतील. या मार्गावरील सर्व स्थानकांवर सहा प्लॅटफॉर्म असतील. स्टेशन मेट्रो लाईन्स आणि रोडवेजशी जोडली जाईल. स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध असतील.
Web Summary : India's first bullet train is slated to begin operations on August 15, 2027. The initial phase will connect Surat to Bilimora, followed by Vapi to Surat, and ultimately Mumbai to Ahmedabad. The project utilizes Japanese Shinkansen technology.
Web Summary : भारत की पहली बुलेट ट्रेन 15 अगस्त, 2027 को शुरू होने वाली है। पहला चरण सूरत से बिलिमोरा तक होगा, फिर वापी से सूरत, और अंत में मुंबई से अहमदाबाद तक। इस परियोजना में जापानी शिंकानसेन तकनीक का उपयोग किया गया है।