शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व राजकीय जाहिराती हटविण्याचे रेल्वेचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 08:14 IST

रेल्वेगाड्यांमध्ये चहासाठी दिल्या जाणाऱ्या कागदी ग्लासवर भाजपची ‘मै भी चौकीदार’ ही निवडणूक घोषणा छापण्यावरून मोठा वाद झाला होता.

नवी दिल्ली : रेल्वेकडून दैनंदिन व्यवहारांत विविध प्रकारे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होण्याचे प्रकार उघड झाल्यानंतर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी रेल्वेच्या आवारातून व रेल्वेशी संबंधित सर्व प्रकारच्या साहित्यांतून सर्व प्रकारच्या राजकीय जाहिराती तात्काळ हटविण्याचे आदेश रविवारी दिले.

रेल्वेगाड्यांमध्ये चहासाठी दिल्या जाणाऱ्या कागदी ग्लासवर भाजपची ‘मै भी चौकीदार’ ही निवडणूक घोषणा छापण्यावरून मोठा वाद झाला होता. तसेच रेल्वे तिकिटांच्या मागील बाजूस छापलेली पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे आचारसंहिता लागू झाल्यानंतरही कायम असण्यावरून रेल्वे प्रशासनास निवडणूक आयोगाने धारेवर धरले होते.

या पार्श्वभूमीवर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष यादव यांनी सर्व विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना तातडीने एक संदेस पाठवून असे कळविले की, रेल्वेची तिकिटे, अन्य प्रकारची स्टेशनरी अथवा रेल्वेच्या आवारात अन्य कुठेही कोणत्याही राजकीय नेत्याचे छायाचित्र असलेल्या जाहिराती असतील त्या तात्काळ हटविल्या जाव्यात. जाहिरात एजन्सीलाही त्यासंबंधी योग्य त्या सूचना द्याव्या. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल रेल्वेकडे खुलासा मागविण्यात आला आहे . तसेच याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची नावेही रेल्वेकडे मागितली आहेत, असे निवडणूक आयोगाने शनिवारी स्पष्ट केले होते.त्याआधी रेल्वेतील खान-पानसेवा व आरक्षणाचे काम पाहणाºया ‘आयआरसीटीसी’ने एका निवेदनात म्हटले होते की, ‘मै भी चौकीदार’ अशीघोषणा छापलेल्या पेल्यातून रेल्वेमध्येचहा दिला जात असल्याबद्दल चौकशी केली गेली. ‘आयआरसीटीसी’चीपूर्वानुमती न घेता असे केले जात होते. कामात कसूर केल्याबद्दल पर्यवेक्षक वपॅन्ट्री प्रमुखांकडून खुलासा मागविण्यात आला असून सेवा पुरवठादार एजन्सीला एक लाख रुपये दंड करण्यात आला आहे. याबद्दल कंत्राट रद्द का करू नये अशी कारणे दाखवा नोटीसही एजन्सीला बजावण्यात आली आहे.मागविला खुलासारेल्वेतील खान-पान सेवा व आरक्षणाचे काम पाहणाºया ‘आयआरसीटीसी’ने एका निवेदनात म्हटले होते की, ‘मै भी चौकीदार’ अशी घोषणा छापलेल्या पेल्यातून रेल्वेमध्ये चहा दिला जात असल्याबद्दल चौकशी केली गेली. ‘आयआरसीटीसी’ची पूर्वानुमती न घेता असे केले जात होते. कामात कसूर केल्याबद्दल पर्यवेक्षक व पॅन्ट्री प्रमुखांकडून खुलासा मागविण्यात आला असून सेवा पुरवठादार एजन्सीला एक लाख रुपये दंड करण्यात आला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेAdvertisingजाहिरातElectionनिवडणूक